नवीन जग

                नवीन जग 

कशाला पाढे करायचे पाठ,

संगणकाशी पडली आपली गाठ!

विज्ञानाचे जग नवे,

अनायासे मिळे जे हवे!

बेरीज, वजाबाकी, गुणाकार,

बटणे दाबा गणित तयार!

पत्र- बित्र आता लिहिणार कोण?

कानाला लावा मोबाईल फोन!

मैदान नको कॉम्प्युटर खेळू,

टीव्हीतला चेंडू घरबसल्या झेलू!

पोळी नको आई, दे पिझ्झा बर्गर

दूध नको बोर्नविटा हवा रुचकर!

नव्या जगाशी दोस्ती करू!

नव्या अशांचे खांब रुजू!

🖊️ मधुरा पाटील. जुनोनी ,उस्मानाबाद 

पूर्वपरवानगी कविता प्रकाशित करू नये.

 

 

 

 

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments