नवी आशा

नवी आशा

होऊ  दे जरा उशीर,

पण सोडू नको तू धीर,

येईल रे तुझ्याही मुठीत हे आभाळ,

तू घेऊ नको माघार.

कोणता विश्वास अन् कोणता दिलासा,

कोणता केला गुन्हा,

जिंकूनही खेळ सारा हरतो का पुन्हा.

आहेत खूप तुझ्या आशा,

रोजची नवी पडते तुझ्या झोळीत निराशा.

थोडी होईल रे वेदना ,थोडा लागेल रे घाव,

येईल रे तुझ्या ही हातात एकदा पुन्हा हा डाव.

रात्र संपता होईल रे पहाट,

नवे आयुष्य पाहत आहे तुझी वाट.

🖊️ मधुरा पाटील,जुनोनी उस्मानाबाद

पूर्व परवानगीशिवाय कविता कोठेही प्रकाशित          करू नये.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मधुरा पाटील

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments