वैभव लक्ष्मी

आदितीन गाडी लॉक केली. आणि तिथच ती विचार करत उभी राहिली . नुकतीच आईला ऑफीसमध्ये सोडून आली होती. आईच्या ऑफीसच वातावरण फारस चांगल नव्हत आईच्या भिडस्त स्वभावामुळे सहकारी आणि बॉस सुद्धा फार त्रास देत कटकट नेहमीचीच या विचारात च तीघरान गेली थोडफार आवरल आणि फोन वर मैत्रीणीशी बोलायला लागली. बोलता बोलता तिचा केव्हा डोळा लागला तिला ही कळलं नाही

 

आदिती नुकतीच B.Sc BEd झाली होती आणि नोकरीच्या शोधात होती

इकडे नीरजा ऑफीस ला आली. टेबल स्वच्छ केल . कामाच साहित्य काढलं तेवढ्यात फोनची रिंग वाजली त्याचवेळी केबीनमधून बोलवण आलं . न वऱ्याच्या ऑफीसमधून फोन होता नेहमीप्रमाणे नवरा दारू पिऊन ऑफीसमध्ये पडला होता नीरजा भीतभीतच केबीन मध्ये गेली . मी – मला … अर्ध्या तासाची सुट्टी हवी आहे . जाऊन येते अ …. अर्ध्या तासातच येते असम्हणू न बॉसच्या होकार नकाराची वाटन पाहता निघाली ऑटो करून ऑफीसला आली दोघाचाघांच्या मदतीन नक्याला ऑटोत टाकल आणि घरी आणल

घरीयेणाऱ्या आवाजानं आदिती जागी झाली झालेला प्रकार तिच्या लक्षात आला आईला पुन्हा ऑफीसमध्ये पोहचवून दिल

नीरजान बॉसच्या बडबडीकडे लक्षदिल नाही कामाला लागली. भराभर कसातरी दिवस संपत आला पणतिच मन शांत नव्हत आताशा राजेशच हे नेहमीचच झालं होत पैसा पुर त . नव्हता वैतागलेल्या मनःस्थितीत च ऑफीस संपल आणिती घरी आली घरी आली

घरी आल्या वर चहापाणी झाल आणिती निवांत बसली तिच्या मैत्रिणी चा विभाचा फोन होता विभा तिची जिवाभावाची मैत्रीण . तिला नीरजाची परिस्थिती माहित होती

नव .ऱ्याचा त्रास ऑफीसमधला त्रास आर्थिक परिस्थिती जेमतेम . तिन खुशाली विचारली आणि मग नीरजाला म्हणाली ‘ अग तू वैभवलक्ष्मीच व्रत का करत नाहीस? सगळा विधी तिन समजावून सांगितला . पोथी आणायला सांगितली आणि म्हणाली अग परवाच शुक्रवार आहे थोड लवकर उठून प्रतकर सगळं नीट होईल

नीरजा लाही त पटलं आणि शुक्रवार आला ती लवकर उठली सडासंमार्जन झाल सकाळच आवरलं आणिती पूजेला बसली संकल्प केला आणि यथासांग पूजा झाल्यानतर तिचमन खरच शांत झाल . म्हणता म्हणता नीरजाचे एकवीस शुक्रवार पूर्ण झाल आणि दुसऱ्याच दिवशी आदिती ला नोकरीची ऑर्डर मिळाली शाळाही छान होती आदिती खुश होती .

नीरजानं व्रत चालूच ठेवल कधी देवाला हातन जोडणारा नवरा आरती ला हजर राहू लागला हळूहळू त्याच्यात बदल होत गेला त्यानं दारू न पिण्याचा संकल्प केला आणि तो पाळला देखील

पणनीरजा साशंक होती हे कुठपर्यंत टिकणार हे परमेश्वरालाच ठाऊक पण राजेशन मनावर घेतल्यान दाऊ हळूहळू बंद झाली आदितीच्या शाळेत एक समवयस्क शिक्षक होते त्यांच आणि आदितीच सूत जमलं तिन आई ला सांगितल दोन्ही घरी सर्वपसंत पडल आणि काही दिवसांनी आदितीच लग्न झालं आदिती खुश होती

नीरजा च ऑफीसच वातावरणा नवळलं सगळ सुरळीत होत . नीरजा ऑफीस मध्ये मोकळी रहायल लागली बोलायला लागली आनंदी हसतमुख दिसायला लागली ही सगळी वैभव  ‘ लक्ष्मीची कृपा हे व्रतr चांगलंच फळाला आलम्हणून नीरजान व्रत चालूच ठेवल

वैभव लक्ष्मीच कृपाछत्र लाभून ढासळलेला संसार सावरल्या गेला घराच रुपांतर एका सुखी समाधानी आनंदी घरात झाल धन धान्य लक्ष्मी पाणीभरत होत्या सुखाचा प्याला काठोकाठ भरला होता नीरजाला यापेक्षा काय हव होत? माझीच दृष्ट मला न लागो …. :

हीसाठा उतराची कहाणी पाचा उतरी सुफळ संपूर्ण .

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Anmol Anand Kulkarni

सुंदर..