पाऊस

पाऊस
शुभ्र आकाशात ।  पांढरेच ढग ।
पावसाला राग । कशामुळे ॥१

माध्यमे सांगती । अंदाज तो भारी ।
जादा सरासरी । पर्जन्याची ॥२

बातम्या ऐकून। बळी सुखावतो ।
घाईने करतो । मशागत ॥३

दावी लगबग ।  बियाणे आणण्या ।
वेळेत पेरण्या । करण्यास ॥४

नक्षत्रां नुसार । पडण्या विसरी ।
बळीराजा भारी । चिंतातुर ॥५

आता तो पाउस । दावतो वाकुल्या।
अंदाजा टपल्या । मारावया ॥६

विनवि मिलिंद। वरूण राजास।
हारवेल घास । तुझ्यामुळे ॥७
✒मिलिंद कुलकर्णी, दानोळीकर
३ जुलै  २०२२

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Anmol Anand Kulkarni

वाह..