मोबाईल

५८ मोबाईल
अनादी कालपासून , सुरू होती छान प्रथा,
एकमेका सांगायाची , आपली ती व्यथा,
प्रत्यक्ष भेटून अथवा , व्यक्तींच्या हो करवी ,
आपल्या गणगोता , खुशाली ती कळवी.॥१॥

नसे प्रवासी साधन , तरी कळे वर्तमान,
व्यक्ती भेटता आपली , मना वाटे समाधान,
पुन्हा सुरू झाले पोस्ट , लोक वापरती पत्र,
ख्याली खुशाली कळण्या , होई वापर सर्वत्र.॥२॥

पुढे झाली हो प्रगती , सुरू होतो टेलीफोन,
आवाज तो ऐकण्या , आतुरले आपले कान,
महत्त्वाच्या निरोपाला , आले पुढे तार यंत्र,
मग बुजुर्ग देतसी , सर्वांना याचा कानमंत्र.॥३॥

होते आनंदी ते सर्व , पुरी होती ती व्यवस्था,
मग आला मोबाईल , सुरू झाली नवी चिंता ,
वेळ मिळेना खासगी , येता हाती मोबाईल ,
मग चालतो विचार , कसे फसवले जाईल.॥४॥

आवाजासवे व्यक्ती , प्रत्यक्ष दिसतसे हाती,
खोटं बोलण्यामुळे , आता दुरावती नाती,
काय म्हणावे ते यासी , प्रगती वा अधोगती ,
योग्य वापर करून , जपू आपली संस्कृती .॥५॥
✒मिलिंद कुलकर्णी, दानोळीकर
२३ जुलै २०२२

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments