मातृभूमी

हिंदुस्थान असे । माझी जन्मभूमी ।
हीच मातृभूमी । पुण्यस्थान ॥

संस्कृती आपली । असे पुरातन ।
धर्म सनातन । इथलाच ॥

संस्कार वाढवी । पौराणिक कथा ।
राऊळात माथा । टेकवावा ॥

पांडव कौरव । येथे जन्मा येती ।
त्यांचीच महती । व्यासा मुखी ॥

वाल्मिकीनी केले । रामायण सिद्ध ।
कार्याने प्रसिद्ध । शिवराय ॥

फंदफितुरीने । पारतंत्र्य आले ।
स्वातंत्र्य लाभले । आहुतीने ॥

मिलिंदाला वाटे । काया वाचा मनी ।
राष्ट्रप्रेम ध्यानी । असू द्यावे ॥
✒मिलिंद कुलकर्णी, दानोळीकर
१८ जुलै २०२२

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments