गुरू पौर्णिमा

आषाढाचा मास । आध्यात्मिक आस ।
पर्वणीही खास । शिष्य वर्गा ॥

आपल्या गुरुंचे । करावे स्मरण ।
वंदावे चरण । पौर्णिमेला ॥

अज्ञान अंधार । दूर करणार ।
जीवना आकार । गुरूकृपे ॥

माता पिता आद्य । पश्चात शिक्षक ।
मग आध्यात्मिक । गुरूवर्य ॥

यांच्या सवे होते । जीवन ते सुरू ।
महत्वाचा गुरू । अनुभव ॥

गुरू परंपरा । असे सर्वश्रुत ।
उत्सव प्रघात । धर्मातीत ॥

गुरूंच्या चरणी । नमितो मिलिंद ।
घ्यावया आनंद। जीवनाचा ॥
✒मिलिंद कुलकर्णी, दानोळीकर
१३ जुलै २०२२ (गुरूपौर्णिमा)

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments