लाजाळू

दिसतसे छान । लाजाळू ते नाव ।
खात असे भाव । भूमिवरी ॥१

प्रत्येक सजीवा । देऊन सौंदर्य ।
दावीले औदार्य । निसर्गाने ॥२

वर्षा ॠतु मध्ये । पाझरे डोंगर ।
फुलले पठार । रम्य दिसे ॥३

सांगतात ग्रंथ । करा तिर्थाटन ।
हेतू पर्यटन । शुद्ध असे ॥४

भटकंती नांवे । फिरत रहावे ।
सौंदर्य पहावे । निसर्गाचे ॥५

पर्यावरणाचा । नका देऊ बळी ।
निसर्गसाखळी । तोडूनिया ॥६

आर्जवी मिलिंद । वैश्विक मानवा।
ठेवा तो जपावा । नैसर्गिक ॥७
✒मिलिंद कुलकर्णी,दानोळीकर
२ जुलै २०२२

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments