आषाढी वारी

वैष्णवांना प्रिय । पंढरीची वारी ।
मुखी हरी हरी । सदा असे ॥

धावा विठ्ठलाचा । मनी तो असावा ।
चालुनी थकवा । कैसा येई ॥

विठ्ठल नामाचा । करता गजर ।
पाडतो विसर । प्रपंचाचा ॥

माऊली नामात । आहे एक शक्ती ।
संसारी आसक्ती । मग कोठें ॥

राम कृष्ण हरी । म्हणावे माऊली ।
कृपेची सावली । निरंतर ॥

चंद्रभागा स्नान । भाळी बुक्का गंध ।
स्वर्गीय आनंद । जीवनात ॥

पुण्य संपादण्या । एकादशी खास ।
मिलिंदाला आस । सावळ्याची ॥
✒मिलिंद कुलकर्णी, दानोळीकर
९ जुलै २०२२

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments