बैलपोळा

“४९ बैलपोळा”
आजच्या सणाचे । विशेष महत्व ।
ठेवतो ममत्व । बैलांप्रती ॥

मालकाच्या संगे । वावरात कष्टी ।
याला कुठे सुट्टी । पुर्ण जन्म ॥

काही मोजकेच । वार पाळणार ।
नाही जुपणार । सोमवारी ॥

बळीराजा साठी । कौतुक सोहळा ।
बेंदूर वा पोळा । नांव याचे ॥

पुर्व संध्या दीनी । वृषभ पुजन ।
खिचड्याचा मान । खाण्यासाठी ॥

कंडा दोरी नवी । शिंगे रंगणार ।
झुल डौलदार । अंगावरी ।

वाजंत्रीच्या संगे । गावभर फेरी ।
कौतुक ते भारी । मिलिंदाला ॥
✒मिलिंद कुलकर्णी, दानोळीकर
१२ जुलै २०२२

मिलिंद प्रभाकर कुलकर्णी, दानोळीकर

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments