मिठी

नाहीत चंद्र-तारे; नाही फुलांचा दरवळ वगैरे, सख्याच्या मिठीत “आईची” ऊब आहे.
रोमांच नाही फक्त; कधी फुलता भीतीचा शहारा,
त्याच्या मांडीवरही जाणवतोच की, पदराचा वारा.
अगणित दुखऱ्या जखमांना;
असते त्याच्याच प्रेमळ; थोपटत्या हातांची छाया,
मी रडता रडवेला तो; मी हसता वेडावणारा; अगदी मातृहृदयातून जशी;  पाझरती त्याची माया.
खरंच, नाही तो रुक्मिणीच्या कृष्णासम;
सीतेचा रामही नाही;
सुभद्रेचा अर्जुनही नाही,
तो निव्वळ भाबड्या “आईचे” रूप आहे…
सख्याच्या मिठीत आईची ऊब आहे….
– आकांक्षा…
१७/६/२०२२

आकांक्षा अरविंद पटवर्धन

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments