नजर

जंग जंग पछाडले मी

एक नजर पाहण्या तुला

तुझ्या नजरेची जादू

ह्या नजरेत कैद करायला.

तुझ्या नजरेने मला हेरले

त्यातच सामावून घेतले

माझ्या नजरेने लोटून टाकले

तुझ्यात विसावून राहिले.

लुकलुकणाऱ्या बाहुल्या तुझ्या

आता बोलू लागल्या

आठवणींच्या त्या जगात

पुन्हा नेऊ लागल्या.

असंख्य आठवणींना उजाळा

एका क्षणात मिळाला

तुझ्या सहवासाचा आनंद

माझ्या नजरेला मिळाला.

शेअर करा..

guest
2 Comments
Inline Feedbacks
View all comments
Anmol Anand Kulkarni

मस्त..एक नंबर..