भीक भूक आणि भिकारी

भीक भूक आणि भिकारी

काय नशिबी आले
आली हातामधे वाटी
घेतो पाठीवर काठी
सर्व काही पोटासाठी
भिकारी म्हंटले की डोळ्यासमोर काय येते?? फाटके मळकट कपडे घातलेला हाथ पसरून भिक मागणारा .
दरिद्रता दाखवत करुणापूर्वक उदरभरणासाठी काहीतरी मागतो.
सकाळी संध्याकाळी मंदीराच्या दारात बसून भीक मागतो. किंवा रेल्वेच्या आत मध्ये प्लॅटफॉर्म वरती रस्त्यामध्ये सिग्नल ला आणि सार्वजनिक बागा प्रेक्षणीय स्थळे इथे भिकारी जास्त दिसतात
ज्यांना काम करायला नको आयता पैसा मिळतो आणि मस्तपैकी त्याची चैन करावी हाच उद्योग असतो किंवा अशा काही संघटना आहेत त्या मुद्दामून मुलांना किंवा महिलांना भिकारी बनवतात आणि पैसे मागायला लावतात
अत्यंत दारिद्रय आले, असताही जो मानी पुरुष याचना करीत नाही, त्याचा मोठेपणा या त्रिभुवनात मावणार नाही.
कडेवरबाळ घेऊन भीकमागणाऱ्यां महिलांचातर सुळसुळाट वाढला आहे .पाचतेचौदावर्षेवयाची मुलेही वर्दळीच्या ठिकाणी हातपुढे करू लागली. आहेत एकूणच शहराच्या कोपऱ्याकोपऱ्यांवर भीकमागणाऱ्यांची साखळी दिसू लागते.
स्वतःच्या हातांनी कष्‍ट करून मिळवलेले अन्न-मग ती पाण्यांसारखी कांजी का असेना- त्याची चव काही औरच असते.
भीक मागणे हे कधी ही चांगले लक्षण समजले जात नाही. भीक मागणे म्हणजे आपण निष्क्रिय आहोत त्याचे दर्शन करणे होय. एखादा व्यक्ती कोणतेही शारीरिक श्रम न करता किंवा आपल्या बुद्धीचा वापर न करता आपली उपजीविका भागवतो म्हणजे त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. एखाद्याची मदत मागणे म्हणजे भीक मागणे नव्हे. मदत मागणे आणि भीक मागणे यात फरक आहे. आपण दुसऱ्यांच्या मदतीशिवाय राहू शकत नाही परंतु पूर्णपणे दुसऱ्यावरच आपले सर्व काही अवलंबून राहाणे हे निश्चितच योग्य नाही.
समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटल्या प्रमाणे जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.
कोणी भीक मागताना पाहिले की त्याची आपणास कीव येते. परंतु काही लोकांना भीक मागणे म्हणजे कसल्याही प्रकारची गुंतवणूक न करता अधिकचे श्रम न करता पैसा कमाविण्याचा एक सोपा व्यवसाय वाटतो. एकदा जर भीक मागून पोट भरण्याची सवय लागली की त्यांना काम करण्यात रस वाटत नाही.
भारतात एवढी गरिबी असली तरी काही भिकारी असे आहे ज्यांनी भीक मागून मागून लाखोंचे फ्लॅट आणि स्वत:साठी घर खरेदी केले आहे. विश्वास नसेल ना! पण ही बाब खरी आहे.
सर्वात श्रीमंत भिकार्‍यांबद्दल सांगत आहोत, ज्यांनी चांगला बँक बॅलेस जमा करून ठेवला आहे आणि तरीही सिग्नलवर भीक मागताना दिसतात. यात जास्तकरून भिकारी मुंबईचे राहणारे आहेत
मी तसा ऐकले की भिकाऱ्यांची बँक आहे भिकाऱ्यांसाठीच आणि त्याच्यामध्ये ते भरपूर पैसा जमा करून असतात.
मध्ये एकदा बातमी वाचली होती की ज्या भिकाऱ्यांना आपण दान देतो म्हणजे त्यांना फक्त पैसेच हवे असतात. आणि आपण जर काही खायचं दिलं ना तर ते नको सांगतात आणि दिलेल्या पैशांची ते मस्तपैकी ते हॉटेलिंग करतात नंतर टॅक्सी रिक्षा करून घरी जातात आणि आपण इकडे चालत वगैरे घरी जातो आणि घरी जाऊन वरण भात खातो तर असं सगळं चित्र आहे .मग आपण त्यांना भीक द्यायची की नाही द्यायची काहीच कळत नाही ना.
कुणाच्या डोळ्यांमध्ये कुठले भाव आहेत ते ओळखणे कठीणच आहे तरीही जे ज्यांना हातपाय नाहीयेत आणि अगदीच असह्य वाटतात आपल्याला थोडाफार तरी आपल्याला ओळखता येतच असावं ना त्यांना भीक द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं .
फक्त एवढी काळजी घ्यावी की दान देता देता आणि खर्च करता करताआपल्याला भिकारी व्हायची पाळी येऊ नये .
माझ्या ओळखीतला एक माणूस आहे तो आमच्या कॉलनी मधल्या देवळासमोर असतो तो त्याला पाय नाही शिवाय आंधळा आहे तरी तो फुल आणून त्याचे हार बनवतो व विकतो तर सांगायचा मुद्दा हा की तो विकलांग असूनही मानाने जगण्याची धडपड करतोय मग अशांना आपण चार पैसे जास्त दिले तर काहीच बिघडत नाही.

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
प्रवीण

सध्या तर काही लोकांनी भिक मागणे हा व्यवसाय बनवला आहे, काही जण तर तृतीय पंथीय असल्याचा आव आणून पैसे गोळा करतात.