फॅशन ची आग

फॅशन ची आग..

फॅशन ची आग मी म्हटले कारण आपण चारचौघांमध्ये उठून दिसावं आपले व्यक्तिमत्त्व खुलून दिसावे म्हणूनच तर वेगवेगळ्या फॅशन करून दुसऱ्याला आकर्षित करून घ्याव असे जेंव्हा वाटते ती फॅशन ची आग आहे. हल्ली तर वर्षाचे 365 दिवस वेगवेगळे कपडे घालून सर्वजण मिरवत असतात .
कपडे तसं बघायला गेलं तर जिकडे तिकडे दुकान आणि जिकडे तिकडे ते उपलब्ध असल्याने खप खूप वाढलेला आहे.
शिवाय आपण करू ती फॅशन असते कोणी कपडा पोटावर कापला तर कोणी हातावर कापतो तर कोणी कोणी त्याचे पाय कापून पॅंटी चे थ्रीफॉर्थ करतो शॉट्स बनवतं कितीतरी विविध प्रकार करून आपण फॅशन निर्माण करत असतो आणि एखाद्याने घातलं की सगळेजण कॉपी करतातच. मग काय ट्रेंड सुरू होतो.
फॅशन हा एक सामूहिक वर्तनप्रकार आहे. तिचा संबंध वेशभूषा, आभूषणे, यांच्याशी असतो. विचारसरणीच्या बाबतीतही फॅशनचा प्रभाव दिसून येतो. फॅशनवरून व्यक्तीचे समाजातील स्थान, तिचा दर्जा लक्षात येऊ शकतो. शैली किंवा स्टाइल कलेसंबंधी असते. शैलीतून सौंदर्यरचना, सौंदर्यनिर्मिती प्रकट होते. एखादी गोष्ट ठराविक कालावधीकरिता फारच प्रचलित असते, . काही रंग डोळ्यांना सुखावतात म्हणून त्यामध्ये अभिरुची असते, तर केवळ फॅशन म्हणूनही काही रंग निवडले जातात. पूर्वी काही रंग घातले जात नव्हते पण आता उदाहरणार्थ …काळा राखाडी हे कलर खूपच फॅशनमध्ये आहेत.कधीकधी फॅशनमध्ये अभिरुची आढळते, तर कधी तिला मुरड घालावी लागते. कित्येक वेळा असे हाते, की एका समूहात फॅशन कालबाह्य झालेली असते, तर तीच दुसऱ्या समूहात लोकप्रिय असते.
. फॅशनमुळे अभिवृत्ती आणि कृती यांत झपाट्याने बदल होतो. फॅशनचे अनुकरणदेखील फार झपाट्याने होते. फॅशनमध्ये मान्यतेचा आणि अमान्यतेचा अंश असतो. त्यात भावनिकता समाविष्ट असते. तथाकथित पुरोगामी व्यक्ती फॅशनकडे काहीशा उपहासाने पाहते, तर सामान्य माणसाला त्याचे काहीच वाटत नाही. फॅशन आणि खूळ (फॅड) यांच्यात फरक आहे
कारण खुळ हे ठराविक लोकां पुरताच मर्यादित असतं आणि ते पण ठराविक काळापुरतं .त्याच्यामुळे त्याच्यात थोडाफार वेडेपणाची झाक असते अतरंगी कलर घालतात काहीजण .
काहीतरी वेगळे करण्याची प्रवृत्ती फॅशनमध्ये असते. कित्येक वेळा फॅशन इतकी रूढ होते, की तिचे रूपांतर कालांतराने रूढीत होते. फॅशनचा विचार संस्कृतीच्या व्यापक संदर्भात केला पाहिजे. रूढी आणि परंपरा यांच्या तुलनेत फॅशन्स बऱ्याच अस्थिर असतात आणि त्या अल्पकाल टिकतात. फॅशन ही एका प्रकारे सामाजिक कर्मकांड आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. गेल्या शतकात जपानमध्ये खाणे-पिणे, पेहराव करणे, घरे बांधणे यांबाबत अत्यंत कडक नियम होते, त्यामुळे तेथे फॅशन जवळजवळ नव्हतीच.
पहिली ते दहावी शाळेमध्ये युनिफॉर्म घालून कंटाळलेली मुलं कॉलेजमध्ये नव्या नव्या फॅशनचे कपडे घालतात किंवा शाळा संपली की क्लासला जाताना किंवा इतर कुठे बाहेर जाताना कधी एकदा युनिफॉर्म काढून दुसरे कपडे घालतो असे त्यांना होते. कारण त्यांना एकसाचे पणां आवडत नाही.
सिनेमा टीव्ही सिरीयल जाहिराती यांचा खूप मोठा पगडा असतो फॅशन बदलण्यामध्ये .महत्त्वाच्या व्यक्तींनी कपडे घातले की त्याचे अनुकरण लगेच होते. पण तरीही आपल्याला काय चांगले दिसते याची जाणीव असेल तरच ते छान दिसू शकते म्हणूनच अंधानुकरण करून फॅशन आत्मसात करू नये आपल्याला जे आवडेल जे आपण घातले की त्यात आरामशीर राहता येईल आणि आपण खूप छान दिसत असेल तरच ते घालावे.
तर व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत म्हणूनच फॅशन का जलवा…कायम असेल
प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Jalindar bande

खुप सुंदर आहे मला आवडली.