दुःख प्रदर्शन

दुःख व्यक्त करणे आणि रोज प्रदर्शन करणे….

मनुष्यप्राणी हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुखासाठी झटत असतो. दु:खाची सावली सुद्धा त्याला नकोशी वाटते. लहान मुल सुद्धा हातातून खेळणे काढून घेतले तर रडू लागते. मी, माझी मालकी आणि माझे सुख यातच मनुष्य रममाण असतो. पण त्याला हे कळत नाही की जीवनातील दुःख आणि सुख हे येणाऱ्या ऊन-पावसा प्रमाणे आहे. पण दुःखाची तीव्रता ही जीवनात माणसाला जास्त वाटते. दुःखाचे बसलेले चटके तो सहसा विसरत नाही. मराठी संत साहित्यात देखील अनेक संतांनी दुःखा वरती लिहून ठेवले आहे.

संत तुकाराम म्हणतात ‘या जगात सुख जवा एवढे तर दुःख पर्वता एवढे आहे’.

तर आता पाहूया हे दुःख म्हणजे नक्की आहे तरी काय ?

खूप खूप माणसाला दुःख होतं माणूस जवळच गेल्यावर .

तो कावराबावरा होतो सैरभैर होतो आणि त्याला सुचतच नाही काय करायचं ते .पण हल्ली त्याला सुचायला लागले आहे. तो व्हाट्सअप वरती डीपी टाकतो किंवा स्टेटस वरती सतत त्या गेलेल्या माणसाच्या पोस्ट टाकतो किंवा फेसबुक वरती त्यांचे फोटो टाकून तू ये तू कुठे आहेस तू का गेलास असं टाकत असतो

दुःखात सर्वांना सहभागी करून घेणे हे बरोबर आहे पण असं त्याचं प्रदर्शन करून त्या दुःखाचे भांडवल करणं जरुरी आहे का???

दुःखामध्ये बुडालेला माणूस त्याला खरंच काहीच सुचत नाही आणि बरोबर आहे त्याला सतत सहानुभूती हवी असते .पण अशी जगजाहीर ..चुकीचं नाहीये का ??आणि गेलेला माणूस अशाने परत येतो का किंवा त्याला काही तिकडे भावना पोहोचतात का ?

पोहोचत असेल तर तो आत्मा नक्की रडत असेल की हे काय चालले माझ्या मागे अजूनही माझा माणूस रडतो आहे आणि मग त्या आत्म्याला दुःख होत नसेल का ????मला पडलेले प्रश्न आहेत

आमच्या एक जवळच्या नात्यांमधले एकाची आई वारली तो आई आई आई असे करून खूप पोस्ट टाकत होता सोशल मीडियावर.

आई आता मी काय करू तुझं लेकरू अनाथ झालं

आई विना भिकारी

आई कुठे आहेस तू आई तू मला का सोडून गेलीस असं सतत टाकत होता .प्रत्यक्षात मजा म्हणजे त्या मुलाने त्या आईला कधीही सांभाळले नव्हते कधीही तिच्या सुखदुःखात सामील झाला नव्हता तिला काय हवे नको हे पाहिलंच नव्हतं तिला कधी चांगलं चांगलं करून खायला घातलं नव्हतं .तिला कधी तो भेटायला गेला नव्हता म्हणजे फक्त हे जगाला दाखवण्यापुरते असतं.

तुम्ही लग्न झालंय तुम्ही प्रेमात आहात तुमच्या घरामध्ये छान छान गोष्टी करतात मग ती सकारात्मकता तुम्ही पसरवत आहे हे छान आहे पण हे दुःख किंवा याबाबत तिच्या काही घटना आपण पोहोचवणे म्हणजे सगळ्यांना नकारात्मकता देणे असं मला वाटते .

एक बाई होती आणि तिचा मुलगा नुकताच एक्सीडेंट मध्ये वारला तर ती त्यादिवशी तिचे रडणे नैसर्गिक होतं ते त्या मुलाची आई होती पण तरी ती आलेले फोन उचलत होती आणि व्हाट्सअप वरती सतत सर्वांना मेसेज टाकत होती .मला ना कळतच नव्हते .तिच्याकडे बघून की ही मुलाचे दुःख मानते .एवढा मोठा धक्का आहे का भावना प्रदर्शित करण्याचा …आता सगळं चमत्कारिक आहे असं नाही वाटत

आणि किती दिवस करायचं ते दुःखाचे प्रदर्शन एक नाही दोन नाही नेहमी म्हणजे दहा दिवस झाले एक महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झाले सतत आपला ते चालूच राहतं म्हणजे लोकांना आठवण करून देतात यामध्ये जो आठवण करून देणारा आहे ना तो मला वाटतं सगळीकडे आपलं दुःख पसरवण्याचं काम करतोय त्याने उलट आपल्या दुःखाला मनामध्ये ठेवून आपलं इतर कशात तरी म्हणजे चांगल्या कामात किंवा कुठल्या तरी क्रिएट टीवी टी मध्ये निर्मिती मध्ये जाऊन आपलं दुःख कमी करून घ्यायला पाहिजे

दुःख उडवायला उंबऱ्यावर कुणीतरी मित्र हवा .

बरोबर आहे त्या मित्रासाठी फेसबुक वरती व्हाट्सअप वरती स्टेटस वरती हाक दिली जाते पण ही हाक हे प्रदर्शन आहे आपणहून आलेला मित्र वेगळा आणि असे जाहिरात करून मागवलेले मित्र वेगळे असतात.

  •  गौतम बुद्धांना हे दुःख सहन झालं नव्हतं आणि म्हणूनच ते बोधीतत्व शोधण्यासाठी निघाले होते .आपण तर सामान्य माणसं हतबल आहोत आपल्यालाही पचणार नाही त्याच्यामुळे त्याचं भांडवल न करता त्याला कुरवाळत न ठेवता त्यातून मार्ग काढणं हाच शहाणपणा आहे

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments