झाडे लावा झाडे जगवा

झाडे लावा झाडे जगवा

 

 

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे

वृक्ष खूप महत्त्वाची भूमिका बजावतात आपल्या पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात.

तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला आहे .वृक्षवल्ली आम्हा सोयरे सोयरे म्हणजे नातेवाईक म्हणजे आमच्या अगदी जवळचे म्हणजेच त्यांना मित्र म्हणायला हरकत नाही

कारण, वृक्ष आपल्यासाठी खूप मदत करतात वृक्ष आपल्याकडून कुठल्याही गोष्टीचे अपेक्षा न ठेवता त्यांच्यापासून मिळणाऱ्या सर्व गोष्टी मनुष्याला प्रदान करतात. वृक्ष हे पर्यावरणाचे संतुलन नीट करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात.

सुरुवातीपासूनच झाडांनी मनुष्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन इत्यादी गोष्टी दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर पृथ्वीवर आज जे काही आहे ते सर्व झाडांमुळेच अस्तित्वात आहे. मनुष्याला जीवनावश्यक वस्तू जसे अन्न, हवा, पाणी, दवा औषधी या झाडांकडूनच मिळतात. म्हणून म्हटले जाते की झाडे लावा झाडे जगवा.

आता सर्वजण विचारतात जागा आहे का झाडे लावायला ??आहे ना निदान आपल्या घरामध्ये बाल्कनीमध्ये चला बाल्कनी नसली तरी घरात झाड लावू शकतो ना आपण इन डोर प्लांट्स खूप आहेत शिवाय आपल्या सोसायटीमध्ये किंवा गार्डन मध्ये जाऊन किंवा रस्त्याच्या कडेला आणि गावात जंगलं नष्ट होत आहेत तिथे आपण फळांच्या सूकलेल्या बिया असतात त्या घेऊन जाऊन झाडे लावू शकतो

थोडसं आपल्याला वेगळ्या वाटेने जायचं असेल तर कष्ट पडतातच म्हणूनच ते कष्ट घेऊन जर आपल्याला फुकट काही तरी मिळत असेल आपल्या जगण्यासाठी तर करायला काहीच हरकत नाही

बऱ्याच गोष्टी ही वृक्ष आपल्याला देतात, अगदी निस्वार्थपणे. आपण मात्र या उपकारांची परतफेड कशी करतो? वृक्षतोड करून, प्रदूषण करून, पिकांवर विषारी फवारे मारून, रानामध्ये वणवे लावून, आपल्या पालनकर्त्या निसर्गाचाच संहार करून. किती क्रूर आणि दुष्ट झालाय माणूस, आपण आपल्या हातानेच आपल्या भावी अस्तित्वाचा विनाश लिहत आहोत.

आता ही वृक्षतोड एवढी सामान्य सामान्य झाली आहे कि आपणास याबद्दल काहीच वाटत नाही. आपण असे वागत आहोत की काही घडतच नाहीये. आपली ही वागणूक एके दिवशी आपल्याला खूप मोठ्या संकटात पाडणार आहे आणि त्याची सुरुवातही झालेली आहे. आपण पाहतो आजकाल दुष्काळ खूप पडतो, पाण्याची टंचाई जाणवते, पृथ्वीचे तापमान वाढत आहे, समुद्राची पातळी वाढत आहे. निसर्ग देत असलेल्या या सर्व चेतांवण्याकडे आपण आपण दुर्लक्ष करत आहोत. जर निसर्गाचा, जंगलांचा असाच ऱ्हास होत राहिला तर तो दिवस दूर नाही जिथे मानवाचे, पशुपक्ष्यांची जगणे अशक्य होईल.

वृक्षारोपण समारंभ खूप होतात पण वृक्षांचे जतन केले जात नाही संवर्धन केले जात नाही त्याच्यामुळे ती झाडे नंतर राहत नाही पण याकडे कोणाचेच लक्ष नसतं एक कार्यक्रम झाला की संपलं आणि आपण एवढे कृतघ्न आहोत की आपल्या जवळच झाड जरी मरत असेल तर ते न बघता पुढे जातो त्याला पाणी देण्यासाठी किती वेळ लागेल पण नाही स्वार्थी हा माणूसच असतो… झाडे नाहीत त्यांना फक्त द्यायचं माहिती असते आणि माणसाला घ्यायचं…. नाही मिळालं तर ओरबाडून…

म्हणूनच झाडे रुदन करतात आणि कधीतरी पटकन कोसळतात आणि आपण म्हणतो एवढं मोठं झाड पडलं पण तसं नसतं ते आत मध्ये त्याला एक खंत असते की हा माणूस माझ्याकडे लक्ष देतच नाही

अजूनही वेळ गेलेली नाही चला झाडे लावूया झाडे जगवू या

 

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments