दहावी निकाल

जनकल्याण निवासी विद्यालयाची शंभर टक्के ची परंपरा कायम

 

लातूर हरंगुळ बुद्रुक येथील जनकल्याण निवासी विद्यालय यातील ९ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक गुण घेतले तर ३६ विद्यार्थ्यांनी ८० टक्के पेक्षा जास्त गुण संपादन करून विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लावला आहे.

शालान्त प्रमाणपत्र परीक्षासाठी ८७ विद्यार्थी बसले होते. यातील विशेष प्राविण्यासह ५९ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत २८ विद्यार्थी श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यालयातून सर्वप्रथम कु. वैभवी धनंजय जाधव (९६.६०%) सर्व द्वितीय चि.यशवंत अशोकराव जगताप (९५.२०%) सर्व तृतीय कु.गौरी गंगाधर गुंड(९४.८०%) तसेच चि.रुद्र मनोज पाटील, सार्थक किसन पवार,आरती नेताजी काळे, तुषार पवन मगर,रुपेश राजाभाऊ शेळके, समर्थ बाबासाहेब हाजगुडे यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले.  सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व दहावी प्रमुख श्री.मन्मथ खिचडे व श्रीमती दाक्षयणीताई भालेकर पालक पर्यवेक्षक सागर कद्रे , विद्याताई कुलकर्णी, राजकुमार चेंडकापुरे, संगिताताई भदाडे यांचे अभिनंदन प्रकल्प समितीचे अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर प्रकल्प कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी , शालेय समितीचे अध्यक्ष उमेशजी सेलूकर, वसतीगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी केले.

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Pravin

अभिनंदन…!!!