संकष्टी चतुर्थी

संकष्टी चतुर्थी –

आज संकष्टी चतुर्थी संकष्टी म्हणजे संकट हरणारा गणपती त्याचे स्मरण पूजन अर्चन आणि कीर्तन व भजन केले तर त्याला ते या दिवशी आवडते आणि सगळ्यांच विघ्न निवारण करतो सगळ्यांची संकटातून सुटका करतो त्यांना शक्ती देतो
हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात.एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो.गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे.
संकष्टी चतुर्थी, ज्याला संकटहार चतुर्थी असेही म्हणतात, हा गणेशाला समर्पित हिंदू कॅलेंडरमधील प्रत्येक चंद्र महिन्यातील एक दिवस आहे. हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो (अंधकारमय चंद्र चरण किंवा चंद्राचा अस्त होणारा पंधरवडा). ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी सर्व संकष्टी चतुर्थी दिवसांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
संकष्टी चतुर्थी म्हंटलं आणि मोदकाचा नैवेद्य गणपतीचा आवडीचा आणि आम्हा सर्व मुलांचा पण त्याच्यामुळे हा एक सण पारंपारिक जो आहे तो आमच्या अत्यंत आवडीचा होता आणि मोदक बाप्पाला प्रिय तसे आम्हाला ही प्रिय पण चंद्रोदय झाल्याशिवाय उपास सोडायची नाही देवाला नैवेद्य दाखवूनच मग तो प्रसाद आम्हाला मिळायचा म्हणून आम्ही स्वतः चंद्राची प्रार्थना करत होतो हे चंद्र हे चंद्रदेवा तु लवकर ये लवकर ये लवकर ये पण तो कसला हट्टी आमच ऐकणार होय तो त्याच्या वेळीच येतो आणि त्यामुळेच त्याचं महत्त्व वाढलेलं असतं
माझ्या भावाला गोड खूप आवडतं आणि मोदक हे त्याच्या खूपच आवडीचे त्याच्यामुळे एकदा काय झालं की त्याने आईला सांगितलं अग आई तू मलाच बाप्पा समज आणि मला मोदक देऊन टाक. बघ मी प्रसन्न होतो आणि तुला तथास्तु म्हणतो .सगळे हसायला लागले त्यावेळेला आईने त्याला मोदक दिला आणि नंतर आम्हा सगळ्यांना ही दिला. तेव्हापासून तिने ठरवलं की मुलांच्या खाण्याच्या वेळेची हयगय करायची नाही त्यांना त्यांच्या वेळी खायला द्यायचं. मनामध्ये गणपतीचे पूजन करायचं .मनापासून मुलांच्या जेवणाच्या आधी नैवेद्य दाखवायचा त्याच्या चंद्रोदयाची वेळ आहे त्याचं काही पालन नाही केलं तरी चालेल असं तिने ठरवलं आणि म्हणूनच मग आम्ही संध्याकाळ आमच्या जेवायच्या वेळी मोदक खायचो . पण आई प्रत्येक संकष्टीला मोदक करायची तर हे मोदक किती वेगळ्या प्रकारचे असतात नाही कोण खोबऱ्याचं बनवतं कोण माव्याचे बनवतो तर कोण शिऱ्या चे तर कोणी चॉकलेट याचे बनवतं .असे वेगवेगळे सारण घालून केलेले वेगवेगळ्या प्रकारचे उकडीचे तळणीचे असे विविध प्रकारचे मोदक असतात.
संकष्टी म्हटलं तर मला एक गोष्ट आठवते आमच्या इकडे एक छोटी मुलगी होती आणि तिला बाहेर जाऊन खेळायची रस्त्यावर खूप आवडत असे .आई तिला खूप ओरडायची . तिच्या मुलीने जास्त बाहेर जाऊ नये म्हणून बोलायचो …रस्त्यावरती बागुलबुवा येतो आणि पकडून घेऊन जातो .पण ती ऐकायची नाही .तर खरोखरच एक नवीन वास एक माणूस आला आणि त्याने तिला सांगितलं आपण बाप्पाकडे जाऊया आणि मग तुला खूप खूप खाऊ देतो .ती मुलगी काय जायला तयार नव्हती मग त्या माणसाने तिला उचलले आणि तो तिला जबरदस्ती घेऊन जाऊ लागला पण ती कसली वस्ताद. ती जोरात ओरडली. ती काय बोलली तर गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया त्या माणसाला वाटलं आता काय या मुलीला कुणी माझ्याकडून सोडणार नाही पण त्याच वेळी एक बाई रस्त्यातून चालली होती तिने पाहिले की ही मुलगी जोरात गणपती बाप्पा का ओरडते मग तिला कळलं काहीतरी वाईट गोष्ट आहे ती त्याच्या मागोमाग गेली आणि थोड्या वेळाने तिने त्याला हटकले तेव्हा ती मुलगी खाली उतरली आणि त्या बाईला जाऊन बिलगली आणि तो माणूस धूम ठोकून पळाला .
गणपती बाप्पा मोरया हे बोलून त्या मुलीचं रक्षण झालं
काही म्हणा गणपती हा विघ्नविनाशक आहे संकट हारी . गजमुखी सुपा एव्हढ्या कानाचा. गदा धारण करणारा दुर्वा लाल फुले आवडीने घेणारा आणि सगळ्यांना गोड गोड पदार्थ खाऊ घालणारा असा हा गणपती सर्वांचा लाडका दैवत आहे मग ती संकष्टी असो अंगारिका असो किंवा गणेश चतुर्थी असो हे सण सगळ्यांनाच आवडतात आणि पारंपरिक पद्धतीने साजरे करतात .
चला तर मग गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments