गणित प्रश्नमंजुषा

गणित हा विषय अनेक जणांच्या कुंडलीतील शत्रु असतो, गणित विषयाची भीती बहूसंख्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे गणित बिघडवून टाकते.

महाभारताच्या कथेतील कर्ण,व्यास मुलांना कथारुपात खूप आवडतात,तेच जर गणितात आले मुलांना कंटाळा येतो,गणित विषयातील ही सार्वत्रिक स्थिती लक्षात घेऊन , जनकल्याण निवासी विद्यालय,लातूरमध्ये ९वी अ च्या विद्यार्थ्यांसाठी “गणित प्रश्न मंजूषा “हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण व्हावी. गणितीय ज्ञानाचे दृढीकरण व्हावे. तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती दूर व्हावी,असा या उपक्रमाचा हेतू होता. स्वयंअध्ययनात कृतीयुक्त, आनंददायी व मनोरंजक पध्दतीने अभ्यास करण्याची पद्धत रुजवणे. विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. अशी त्याची आखणी करण्यात आली होती.

*उपक्रमाचे स्वरूप*

प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांचे १० गट करून करुन त्याला भारतीय गणिततज्ज्ञाचे नाव दिले गेले. त्यांच्यात स्पर्धा आयोजित केल.या स्पर्धेत एकूण ५ फे-या होत्या

*प्रथम फेरी* (प्रश्नोत्तरे/पायाभूत गणितीय ज्ञान)
यात १० गटांना ५-५प्रश्न विचारून अचूक उत्तरासाठी दोन गुण देण्यात आले. उत्तर चुकल्यास तो प्रश्न दुसऱ्या गटाकडे पास केला. त्यांच्या उत्तरास एक गुण वाढीव देण्यात आले. त्याही गटाला अचुक उत्तर देता आले नाही तर प्रेक्षकांना संधी दिली गेली.
१०गुणांची फेरी झाली. या फेरीत पायाभूत गणित ज्ञान, उजळणी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, गुणोत्तर प्रमाण या भागातील प्रश्न विचारले गेले. या फेरीत साधारण असे स्वरूप होते.

*दुसरी फेरी* (मुक अभिनय,खुणेव्दारे प्रश्न विचारणे)
यामध्ये कागदावर लिहिले ला प्रश्न गटातील एकाने समोर येऊन मनात वाचून त्यावर कृतीतून आपल्या गटातील विद्यार्थ्यांना प्रश्न सांगायचा. गटातील सहकार्याने तो प्रश्न ओळखून त्याचे अचूक उत्तर द्यावे. प्रत्येक प्रश्नास पाच गुण देण्यात आले. असे प्रत्येक गटास दोन विचारले गेले. १० गुणाची ही फेरी झाली. यामध्ये असे प्रश्न होते. एका वर्तुळाची त्रिज्या तीन सेंमी आहे तर व्यासाची लांबी किती ?, एका वर्तुळाचा व्यास १० सेंमी आहे, तर त्रिज्येची लांबी किती? असे मनोरंजक प्रश्न या फेरीत विचारले गेलेले प्रश्न होते.

*तिसरी फेरी* (प्रत्यक्ष गणित सोडविणे)

यामध्ये प्रत्येक गटास एक प्रश्न देण्यात आला होता. गटातील एकाने एक प्रश्न निवडून घेवून गेले. गटाने एकत्र बसून दिलेल्या वेळेत सोडवणे आवश्यक होते. प्रत्येक उदाहरणास ५ गुण देण्यात आले होते
उदा. Find the volume of a box if it’s length, breadth and heights are 20cm , 10.5cm and 8cm vespectively?

असे प्रत्येकी उदाहरण देण्यात आले होते. असे प्रश्न या फेरीसाठी निवडले होते.

*चौथी फेरी* (प्रमेय/सुत्र)
८वी व ९वी वर्गातील निवडक प्रमेय चिठ्ठीव्दारे घेऊन प्रमेय व सुत्र सोडवून दाखविले गेले.
Area of triangle=1/2×base× heights

*पाचवी फेरी* (भारतीय शास्त्रज्ञ जीवनी)
प्रत्येक गटास एक भारतीय शास्त्रज्ञाचे नाव देण्यात आले होते.
प्रत्येक गटास त्याच शास्त्रज्ञांची माहिती त्या गटास ५ मी.वाचण्यास दिले.त्यावर आधारित ५-५ प्रश्न विचारण्यात आले. योग्य उत्तरास २ गुण देण्यात आले.

भास्कराचार्य,आर्यभट्ट, नरेंद्र करमरकर, आनंद कुमार, मंगला नारळीकर, ब्रम्हगुप्त, श्रीनिवास रामानुजन, हरिश्चंद्र डॉक्टर अशा गणिततज्ज्ञावर प्रश्न विचारण्यात आले.

सर्व कार्यक्रमाचे आयोजन सहा विद्यार्थ्यांनी केले. प्रश्न विचारणे, प्रश्न काढणे, गुण लेखन, आदी व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडेच होते.

*उपक्रमाचा लाभ*

गणित विषयाची गोडी लागली. स्वयंअध्ययनात गणित विषयाची रुची वाढल्याचे लक्षात आले. विद्यार्थ्यामध्ये गणिताबद्दलचा आत्मविश्वास निर्माण झाला.विद्यार्थी गणिताबद्दल आनंदाने समजून घेऊ लागले. त्यांचा गणितिय शैक्षणिक स्तर लक्षात येऊन काही विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शनाची आवश्यकता लक्षात आली.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments