ट्रेन आणि बरेच काही

ट्रेन आणि बरेच काही –

लोकल ट्रेन
मुंबईसाठी लोकल ट्रेन हे एक खूप छान वरदान आहे कितीही प्रवास असेल तरी त्यात काहीच वाटत नाही म्हणून त्याला जीवनवाहिनी म्हणतात आणि हे सुख बऱ्याच राज्यांमध्ये नसल्यामुळे त्याच महत्त्व नक्कीच जाणवतं.
ट्रेन म्हटलं की खचाखच भरलेले डबे आणि ती गर्दी एकमेकांना धक्का देणं भांडणं डोळ्यासमोर येत. दरवाजातून एकदा काय आत घुसलं तर मात्र खूप छान वाटतं. दरवाजाचे बाजूला जागा मिळाली उभ राहिल तरी पुरेसं असतं किंवा जर ट्रेनमध्ये सीटवर बसायला मिळालं तर उत्तमच .
मग काय आजूबाजूला पाहत राहता येत आणि माहिती मिळते कितीतरी फेरीवाले येतात कितीतरी फळवाले विक्रेते नंतर फुल विक्रेते गजरा विकणारी आणि भिकारी.
वेगवेगळ्या प्रकारची लोक लोकल ट्रेन मध्ये येतात. शिवाय ट्रेनमध्ये प्रवास करणारी सगळ्या वर्गातली माणसंही असतात त्यात काही मध्यम तर काही खूप गरीब असतातआणि काही उच्च वर्गातील सुद्धा आणि गमतीजमती होत राहतात.
ट्रेन मध्ये लोकं गाणी गातात. ट्रेन मध्ये पत्ते रम्मी खेळतात ट्रेन मध्ये गप्पा-गोष्टी करतात ..देवांची पुस्तके वाचतात ट्रेनमध्ये गोष्टींची पुस्तके वाचतात हल्ली मात्र ट्रेनमध्ये मोबाइल मधली गाणे ऐकतात आणि सतत मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसलेली माणसं जास्त दिसतात .
पण ट्रेन एवढ्या सगळ्यांना घेऊन ती आपली गपचूप चाललेली असते जर घरी झोप पूर्ण झाली नसेल तर ती ट्रेनमध्ये पण पूर्ण करता येते त्यांच्या खिडकी मध्ये बसून आपली झोप घेणं हे पण एक मजेदार प्रकरण आहे.
ट्रेन मुळेच किती लोकांचा संसार चालतो कारण कामावर जायला मिळतं आणि काही विक्रेत्यांना ट्रेनमध्येच उदरनिर्वाहाचं साधन आहे त्यामुळे ट्रेन हे त्यांना एक प्रकारचं कमावू साधन आहे जे त्यांना जीवित राहण्यासाठी मदत करते .
एकदा आम्ही प्रवास करत होतो आणि आणि समोर पाहिलं एक बाई जोरजोरात मोठ्यामोठ्याने बोलत होती तर पाहिलं तर ती दुसऱ्या एका बाईशी जी पलीकडच्या सीट वर बसली होती तिच्याशी बोलत होती आणि तो आवाज एवढा मोठा होता की आम्ही मजेत ऐकत होतो त्यांच संभाषण. तर ही एक करमणूक असते .
कधीकधी ट्रेनमध्ये काही बायका किंवा काही जण रडतानाही पाहिलेली आहेत सुख-दुःखं वाट करून देणारी ही आपली मैत्रीण आहे ट्रेन म्हणजे .
कारण त्या मध्येच आपल्याला खूप वेळ मिळतो त्या वेळेचा उपयोग काही विद्यार्थी नक्कीच करतात अभ्यास करतात आणि घोकम पट्टी करून परीक्षेमध्ये मात्र खूप चांगले मार्क मिळवतात.अशी ही ट्रेन त्याच्यामुळे खूप सारं सामान्यज्ञान वाढत.
एकदा एक मुलगी ट्रेन मध्ये दरवाज्यात उभी होती आणि रडत होती अशी ..बरीच उदाहरणे असतात त्यामुळे सर्वांनी दुर्लक्ष केलं होतं पण नंतर ट्रेन चालू असताना ती ट्रेनच्या बाहेर डोकवायला लागली तरी कोणाचं लक्ष नव्हतं …पण नंतर एकाने पाहिलं की ती जास्तच पुढे पुढे जातेय.. तिचा आत्महत्येचा विचार असावा बहुतेक त्याच्यामुळे त्या माणसाने तिला लगेच मागे घेतलं आणि विचारले ….मरने का है क्या ???ती खुप रडायला लागली .
ती म्हणाली हो…
कंटाळा आलाय जगायचा तर असा हा ट्रेन मध्ये सुरू असणारा प्रवास.सुहृदय माणसं असतात जी कुणाचा तरी जीव वाचवतात आणि कधी कधी आपला जीव गमावून बसतात.
ट्रेन मध्ये येणारी फेरीवाली एक अशीच होती आणि तिच्याबरोबर तिचं छोटासा बाळ ते कापडामध्ये तिने झोळी मध्ये लटकवले होते ..झोळी चे तोंड होत ते बंद झाले होत. बाकीच्या बायकां नी तिला सांगितलं तुला काय विकायचंय ते विक. पण ती झोळी त्याचं तोंड उघडलं नाहीतर प्रकाश किंवा हवा कशी मिळेल ?? तर ती म्हणाली काय करू असंच मला करावा लागत .मग एका बाईने तिचे ते बाळ आपल्याकडे घेतलं आणि सांगितलं तू आता तुझं काम कर तुझं काम झालं की मग तुला आम्ही ते बाळ देऊ .त्या बाळाला त्या बाईने मांडीवर घेतलं आणि त्याला पाणी वगैरे दिलं तेव्हा ते बाळ पण खुश आणि ती फेरीवाली पण .
ट्रेन च्या गमती असतात ट्रेन मध्ये जेव्हा पत्ते खेळतात ना लोकं तेव्हा त्यांची मजा बघायची औरच असते की ते विसरूनच जातात आपला स्टॉप म्हणजेच स्टेशन आलंय ते आणि मग नंतर बाहेर बघितलं की आला आला आला आला स्टॉप आला स्टॉप आला करून धावत धावत उतरतात .अशी आहे ट्रेन मधली काही माणसं .जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी होतात आणि त्यांचे बरेचसे कार्यक्रम ठरतात कधी ट्रेनमधल्या ग्रुप ची पिकनिक केली जाते तर कधीतरी हळदीकुंकू असते तर कधी गरबा असतो .असे जीवनातले रोज वेगवेगळे प्रकार आनंद अनुभवताना ट्रेनमध्ये दिसतात.
पण ट्रेनमध्ये मात्र सुरक्षितता च्या दृष्टीने आपण आपली काळजी घ्यावी .चढता-उतरताना ट्रेन चालत असतानाच चढू नये किंवा उतरू नये .इतकी घाई करायची गरज नाहीये आपला जीव महत्त्वाचा आहे हे जाणूनच ट्रेनमध्ये चढावे किंवा उतरावे दुसरी ट्रेन नक्कीच येते पण आपला जीव मात्र येत नाही.

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Anmol Anand Kulkarni

खूप सुंदर लिखाण.