वटपौर्णिमा

वटपौर्णिमा –

आज वटपौर्णिमा

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|

तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|

अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |

अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||

सत्यवानाचे प्राण यमा कडून घेण्यासाठी सावित्रीने ज्या वडाच्या झाडाखाली खाली उपवास केले पूजा केली त्याची आठवण म्हणून ही वटपौर्णिमा .त्या वटवृक्षाच्या मध्ये तिला काय दिसलं असावं…

की तिकडे ब्रह्मा आहे विष्णु आहे महेश आहे आणि सर्व देव एका झाडा मध्येच एकवटलेले आहे त्याच्यामुळे तिने त्या वटवृक्षाला देव समजून त्याची पूजा केलेली आहे.म्हणजेच निसर्ग ..ही झाडे यामध्ये देव वसलेला आहे त्यांची काटछाट करून आपण आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेवू याची जाणीव असावी म्हणून मला वाटतं ही पुजा आपणही करणे योग्य आहे. वृक्ष संगोपन वृक्ष संवर्धन हे आवश्यक आहे हे या सणाच्या माध्यमातून समजले तरी पुरे.

सगळ्या सुवासिनी बायका निघाल्या आहेत वडाला फेरे घ्यायला .सात फेरे sssss काय कळतच नाही .फक्त सात का ???सात जन्म मिळावे स्वतःला…

आणि हाच पती म्हणून पुढचे सात जन्म मिळावा.ज्येष्ठ पौर्णिमा आणि तीच ही वटपोर्णिमा बायका नटून-थटून पूर्वी देवळात जायच्या. तिथे वडाचे झाड असे .त्याची पूजा करायच्या आणि नंतर मग सात फेरे घेऊन पूजा करू एकमेकींना हळद कुंकू लावून वहाण देवून त्या घरी यायच्या. आल्यावर त्या फक्त फळ खावून उपास करायच्या .आताही बायका काय करतात त्या वडाच्या झाडाला म्हणजेच त्याची फांदी कापून घरात आणतात आणि त्याची पूजा करतात आणि लगबगीने ऑफिसला निघून जातात किंवा घरीच राहणाऱ्या असतील त्या घरात गोडधोड करून आपल्या मुलाला नवऱ्याला खाऊ घालतात आणि स्वतः उपास करतात .

जे काय करायचे ते सगळं त्या घरातल्या कर्त्या स्त्रीने बाईने लक्ष्मीने महालक्ष्मीने . रांधा वाढा उष्टी काढा यात जन्म गेला तिचा .विचार करा …आता काय जास्तीत जास्त ऑफिसला जाणं किंवा एखादा उद्योग करणं पण हे काम मात्र संपलेल नाही.

अजूनही स्त्रीनेच मक्ता घेतलाय परंपरा सांभाळायचा तिलाच उपास करायचे तिच्या नवऱ्या साठी किंवा मुलासाठी .पण आपण कधी पाहिले का कि नवरा किंवा मुलं आपल्या घरातल्या स्त्रीसाठी कधी उपास केला आहे किंवा तिच्या साठी कुठली पूजा केली आहे???

हल्ली खूप जोक पण येतात त्याच्यावरती की पुरुष वडाच्या झाडाला फेरे मारतोय आणि तो सांगतोय की मला की ही बायको या जन्मी दिलीय तेवढे पुरे …पुढच्या प्रत्येक जन्मी वेगवेगळी बायको दे किंवा स्त्री बद्दल विनोद केले जातात की स्त्री वडाच्या झाडाला फेरी मारते आणि सांगते की मला प्रत्येक जन्मी वेगवेगळा नवरा दे . पण एवढ खर की तो व ती मात्र दोघेही विचारानी पक्के आहेत की पुढचा जन्म त्यांना मनुष्य जन्म मिळणार आहे. पण हे माहित आहे का की चौर्‍यांशी लक्ष योनी आहेत आणि त्यातून पार झाल्यावर च मनुष्य जन्म मिळतो .

खरं काय आणि खोटं काय

कशाला या फंदात पडावं एक वेगळा बदल म्हणून रोजच्या दिनक्रमात हे करण्यासाठी हा खटाटोप केला तरी त्यात वाईट काहीच नाहीये .एक तर निसर्गाच्या जवळ जायला मिळतं शिवाय सर्वांना भेटण्याचा आनंद असतो तो अनुभवायला मिळतो आणि पावसाळ्यात अस पण खूप आहार खाऊ नये तर हे उपास सुरू झालेत. प्रकृती चांगली राहते. वडाच्या फांद्या म्हणजे त्याच्या पारंब्या नवीन कोंब फुटलेले असतात त्याला .आपल्या डोळ्याने त्याचं सौंदर्य पाहावं म्हणून हे वडाच्या झाडाला जाऊन प्रदक्षिणा असाव्या असं मला वाटतं तिथे नवीन प्रकारची ऊर्जा मिळते ऑक्सिजन मिळतो आणि नवचैतन्य संचारते.

जगात सर्वात दाट सावली असते वडा ची. वडाच्या पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते. त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते. याचसाठी वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे,

त्यादिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतिला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य, मुले-बाळं, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे, असे वटपौर्णिमेला गाऱ्हाणे घालतात. त्यामुळे कदाचित नवरा व मुले दोघेही खुश राहतात आणि घर संसार टिकून राहतो.

वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे.

मला गंमत वाटते ते अशा भाव भोळ्या स्त्रियांची त्या कितीही स्वतःला आधुनिक समजत असल्या तरी असे काही सण आले तर त्या एकदमच पारंपारिक पद्धतीने साजरे करतात साड्या काय नेसतात आणि त्या पूजा वगैरे करतात.

खरंच कुठेही बघा म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये ऑफिसमध्ये आणि रस्त्यावर देवळामध्ये कुठे गेला ना तर तुम्हाला सुद्धा छान साड्या नेसलेल्या नटलेल्या सजलेल्या स्त्रिया दिसतात ते बघणे किती आल्हाददायक आहे नाही का ??

पुरुषांना तेव्हढीच हिरवाई.

म्हणून मला तर वाटतं की हे सण आपण साजरे करावेत म्हणजे आपला मधल्या जगण्याचा जीवन भरभरून जगण्याचा उत्साह कायम टिकून राहील

वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।

अशी प्रार्थना आपण सर्वांनीच रोज वडाखाली बसून केली तर निसर्गाच्या सानिध्यात राहता येईल व नवीन ऊर्जा मिळेल.

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments