शॉपिंग शॉपिंग

  • शॉपिंग शॉपिंग

शॉपिंग शॉपिंग
चला जाऊया शॉपिंगला घरातून हाक ऐकू आली की मग पुरुष लोकांचे धाबे दणाणतात. हो कारण त्यांना खूप पैसे द्यावे लागतात वर हमाली करावी लागते .शॉपिंग म्हंटलं तर कधीकधी अनावश्यक खर्च असतो अनावश्यक वस्तू आणल्या जातात आणि त्या कधी कधी सडत बसतात घरामध्ये .
शॉपिंगची मजा काही औरच असते. शॉपिंग मुळे बाहेरचं वातावरण समजू लागतं तिथले पदार्थ वस्तू त्यांचे भाव त्यांचं आकर्षक असे मॉडेल्स शिवाय त्या वस्तू सुद्धा सुशोभित.
असा हा मनाला मोह पाडणारा शॉपिंग . त्याच्याशीवाय आपल्याला पर्याय नाही .त्याच्यामुळे आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी शॉपिंगला जाणं ही एक छान पैकी करमणूक असते .मनोरंजन असतं आणि आपलं काम होतं शिवाय मन रमून जातं .एक बदल आयुष्यात हवा असेल तर हे शॉपिंगचा फॅड आवश्यक आहे .
वेळ जात नसेल तरी शॉपिंग ही एक मजा असते किंवा आपल्याला खूप वाईट वाटत असेल दुःख वाटत असेल किंवा आपण चांगल्या मूडमध्ये नसतो तरीही शॉपिंग हे आपल्याला म्हणजे आपला मूड बदलू शकतो .म्हणूनच शॉपिंग हा एक चांगला पर्याय आहे की आपण आपले व्यक्तिमत्व बदलण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल घडवण्यासाठी करू शकतो.
माझा एक मित्र म्हणायचा शॉपिंग हे उदासी की दवा आहे.
एकदा मी आणि माझी बहीण शॉपिंगला गेलो होतो तर तिकडे एक माणूस इकडे तिकडे पाहत होता फक्त .संशयास्पद वाटला आम्ही बघत होतो हा असा काय करतोय . मग समजलं की त्याला इंग्लिश वाचता येत नाही आणि त्याला जायचं होतं फळ घ्यायला आणि त्याला समजत नव्हत कुठे फळे मिळतात ते .मग नंतर मदत केली अभी आणि मग तो फळ घेऊन खुश झाला. पण जाता जाता म्हणाला आमच्या गावाकडे यापेक्षाही खूप छान छान फळे येतात इकडे किमती जरा महागच आहेत.
पण बरआहे सगळं एकाच छताखाली मिळतं हो. कपडे मिळतात आणि धान्य मिळतं फळे मिळतात अजून काय पाहिजे. आणि थंड हवा मिळते किती वेळ पण टाईमपास करा कोण काय बोलत नाही तसे बघायला गेलं ना मॉलमध्ये किती तरी फुकटे लोक येऊन बसलेले असतात. हो मी बराच वेळ निरीक्षण केले आहे सकाळपासून येतात आणि मग दुपारी घरी जातात परत संध्याकाळी येतात आणि तीन-चार तासांनी घरी जातात त्यांना कदाचित घर नसावं.
आता शॉपिंग म्हंटलं की हल्ली मॉलमध्ये जातात. पूर्वी तसं नव्हतं आम्ही मार्केट ला जायचो आणि वेगवेगळ्या स्टेशन रोड च्या मार्केटला पण जायचो कारण प्रत्येक ठिकाणाची काहीतरी स्पेशालिटी असायची मग तिकडे जाऊन ते छान मिळतं म्हणून मुद्दामून जायचं.
पूर्ण दिवसाचा एक प्रोग्राम असायचा तो. तिथे जाऊन खायचं प्यायचं खूप सारी शॉपिंग करायची आणि सगळे पैसे संपवून थकून-भागून घरी यायचं यातली मजा काही औरच होती.
हल्ली शॉपिंग म्हणजे ऑनलाइन शॉपिंग ला खूप जोर आलेला आहे कुठे जात नाही घर बसल्या सर्व काही मिळतं पण बाहेर भटकायची नीट पारखून घ्यायची आणि त्या बदललेल्या वातावरणात रमायची ही मजा आता ऑनलाइन शॉपिंग मध्ये नाही.
तरीही अडचणीच्या वेळेला आणि बाहेर जायचं नसेल खूप काम असेल तर मात्र ऑनलाइन शॉपिंग हे खूप छान आहे वेगवेगळे वस्तू वेगवेगळे भाव वेगवेगळे आकार वेगवेगळे प्रकार खूप काही खूप काही वेगवेगळ्या भावात मिळते. शिवाय कुठेही बसून ते करता येते घरात ट्रेनमध्ये ऑफिसमध्ये कुणाला कळतच नाही .
त्या दिवशी ऑफिसमध्ये मी पाहिलं एक बाई ऑनलाइन शॉपिंग करत बसली होती तिच्या समोर एक ग्राहक उभा होता पण ह्या बयाचे लक्ष नव्हतं. आता कसं असेल तुम्हीच सांगा ना??
शॉपिंग आणि बायका मग काय???

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments