कौतुक

कौतुक
कही जण इतके कौतुक करतात
त्याला भरभरून असे म्हणतात
तर काही केवळ चार वाक्य बोलतात
खरंच फार चांगला ना तो असे म्हणतात
कही मात्र २.३ शब्दांत भावना मांडतात
त्याला कसं कमी शब्दात मांडता येते
हे आवर्जून सांगतात
काही फक्त स्मित हास्यात पसंती दाखवतात
तर काही smiley टाकून कौतुक करतात
कौतुक करायला मोठे मन लागते
असे जुनी माणसे म्हणतात
कोत्या मनाची माणसं मात्र गप्पच बसतात
किंवा काही सरळ सरळ तोंडावर निंदा करतात
काही जण त्यात काय एवढे म्हणून ईर्ष्या करतात
आणि स्वतः जळफळाट करून स्वतःवर चिडतात
काही मुक संमती दर्शवतात
पण त्यात हेवा मत्सर द्वेष नक्कीच दाखवतात
कौतुक करायला नको म्हणून काही दूर पळतात
मला मात्र वाटतं
कौतुक असावे जनांचे
निंदा असावी स्वतःची
आपण आपला आरसा होऊन
वाढ वाढवावी स्वतःची

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments