न वाजलेली टिमकी

इतर अनेक सणांसारखा तोही एक सण “होळी ” आपल्यासोबतचे सर्वजण खूप आपल्यासारखेच खूप उत्साहात एक तर सुट्टीचा दिवस आणि गोडधोड खाण्याचा. आपले मित्र नवीन टिमकी घेऊन जीव तोडून ती बेताल वाजवत असतात त्या बेताल वाजवण्याचा मनमुराद आनंद लुटत असतात .तेच बघून आपलेही बालमन बालहट्टावर करत आपल्यालापण हवी अशी टिमकी जीव तोडून वाजवण्यासाठी तो छोटासा आनंद लुटण्यासाठी

“आणूया, पण आत्ता सणाच्या आसपासच्या दिवसात,खूप महाग असते !” वडिलांचे उद्गगार

आत्ता आपल्यालाही मिळणार तोच आनंद , आपल्या मित्रांसारखा…..

‘आपण टिमकी वाजवत गल्लीतून मित्रांसोबत फिरत आहोत ……’, हे चित्र डोळ्यासमोर आणि निरागस हसू गालावर घेऊन सगळ्या होळीच्या सुट्टीचा दिवस आनंदाला पारावार उरत नाही.

टिमकी येते होळीच्या दुसरे दिवशी,सगळ्या गल्लीमध्ये सणाच्या दिवशी वाजलेल्या टिमकीच्या नादाचे पडसाद पण उरलेले नसतात तोपर्यंत ……. वाजवण्याचा सण संपलेला असतो

पण आपली नवीन पहिली टिमकी म्हणून आनंद ओसरुनही उरलेला असतो.पुढच्या वर्षीसाठी तरी झाली.मग पुन्हा पुढच्या वर्षीच्या होळीला आपल्या हातात वाजणारी आपल्या टिमकीचे चित्र रंगवत ती जपून बांधून ठेवली जाते.

नवीन वर्ष उजाडते पुन्हा होळीचा दिवस जवळ येऊ लागतो पुन्हा वेध लागतात ते टिमकीचे

आत्ता सर्वांच्या मित्रांसोबत वाजवण्यासाठी अगदी होळीच्याआधीपासून टिमकी.

लहानपणी आपल्यासारखं बहुतेक आपलं आकाशपण छोटं असावं कारण तो एवढासा आनंद गगनात मावत नव्हता ……..

नाचत नाचत टिमकी काढली वाजवण्यासाठी, ठेवून ठेवून ती थंड झाली होती इतकी की कोणताही उपाय केला तरी ती पुन्हा वाजणार नव्हती. मन खट्टू झालं बालमन होत तरी त्याला हट्ट करून रडणं माहिती नव्हतं त्यामुळे त्या आनंदावरपडलेलं विरजण म्हणजे ती थंड झालेली टिमकी कडे पाहिलं आणि हे आपल्यासाठी नव्हतंच हे मानाने पक्के केलं …….

हो लहानपणीची ती एक आठवण मनात कुठेतरी लपून बसलेली माझ्याही नकळत. आज अचानक समोर आली कारण,खूप सोपं होत काही गोष्टी मिळून सुद्धा आनंद देत नाहीत कारण त्या वेळेत मिळणंच खूप गरजेचं असत. वेळेत नाही मिळालं तरी इतरांसारखा का आपलेपण मन दुःखी होत नाही? हा माझ्या मानाने मला केलेला प्रश्नाचं उत्तर म्हणजे लहानपणीचा हा प्रसंग आहे

त्यानेच शिकवलं होत, ‘काहीतरी मिळालं नाही म्हणून दुःखी होणं, हा उपाय नाही!!’  – -रेणू ताटे (राजश्रेणू)

Renu Tate (राजश्रेणू)

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments