7जून शाळा आणि पावसाळा

7 जुन आणि शाळा व पावसाळा…

 

 

आज सात जून

7जुन म्हटलं की आठवतं पावसाळा आणि शाळेचा पहिला दिवस .

पूर्वी सात जूनला शाळा सुरू होत असे. त्या पावसाची सर मी पण मुद्दामून जोरात येऊन पोचणार 7 जून ला अशी असे.पण तरी शाळेत मात्र जायचं .पहिला दिवस असतो ना नवीन गणवेश आणि नवीन दप्तर नवीन वॉटर बॉटल नवीन पुस्तके नवीन वह्या आणि नवीन वर्गशिक्षक याची उत्सुकता असेच.काही शाळा हल्ली 13 जून 14 जून अशा कधी सुरू होतात किंवा त्यानंतर हा पाऊस .इतका न विचारता नको तेंव्हा येतो .

हा तारखेला तो येणारच म्हणून तो गणवेश आणि ते हो मी एक विसरले सांगायला .नवीन पावसाचे शूज मजा वाटते ते पावसाचं पाणी साठलेले असेल ना कुठेतरी त्याच्यामध्ये चिखल तुडवत राहायचं आणि ते पाणी आपल्या दोस्तांच्या अंगावर थोड उडवायचे आणि मुद्दामहुन त्यात थबक थाबक चालायचे.

आणि या शाळा आणि पावसाळा म्हंटलं तर रेनकोट हवाच मग तो रेनकोट घालायचा आणि ते ध्यान शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जाऊन बसायचं .खूप आनंद होता त्याच्यामध्ये पण कधीकधी रडू यायचं सुट्टी संपली ना वाईट वाटायचं .पण घरामध्ये आता सर्वांना खूष वाटायचं कारण एवढा वेळ तरी का होईना ही कार्टी बाहेर राहिल आणि आपल्याला थोडा मोकळा वेळ मिळेल असं आईला वाटायचं .शाळेच्या सुट्ट्यांमध्ये मधल्या वेळेत ल्या सुट्टीत आपण ते डबे उघडायचे आणि बाहेर पाऊस असेल तर तो बघत बघत खायचं नंतर मात्र नोकरी करताना हा पाऊस आणि हा जून महिना व जुलै ऑगस्ट हे महिने नको झाले होते कारण भिजून भिजून जाणं आणि त्या सगळीकडे पाणी साचलेल असतं .त्या लोकल मध्ये मध्ये बंद होणार पाणी भरणार आणि त्याच्यामध्ये ते दमट दमट वातावरण नको नको वाटायचं .

पण घरी येऊन कांदा भजी खायची आणि आल्याचा चहा प्यायचा यातलं सुख काही औरच होतं .तेलकट पदार्थ खाऊ नयेत पावसाळ्यात ..पण कांदा भजी कोणी सोडत नाही

माझा ना त्या वेळेला एक छोटासा मित्र होता. तो छोटा मी पण छोटी होती ना आणि त्यावेळी पावसामध्ये ना त्याला आवडायचे ते बटाट्याचे वेफर्स .तो ते घेऊन यायचा डब्यामध्ये .पण त्याचा डबा तो प्लास्टिकचा व झाकण नीट नसल्यामुळे जरा हवा त्याच्या डब्यातजायची त्याच्यामुळे वेफर्स मधल्या सुट्टीमध्ये असे दमट दमट व्हायचे म्हणजे त्याचे असे नरम नरम चिवट काप व्हायचे .मग आम्ही त्याला ना नाव ठेवलं होतं डंपटी.

ते नाही का इंग्लिश कविता.. हमटी डमटी चे त्यातले हे नाव .तरी त्याच्या डब्यात नरम नरम झालेले ते वेफर्स चे काप आम्ही आवडी ने खायचो.

मी तरीही त्या वेळी त्याला चिडवत असे

डमटी आला शाळेत

पाऊस आला डब्यात..

तो डब्यातला पाऊस ..ती शाळा आणि त्या आठवणी…कधीही न विसरता येणाऱ्या..

 

 

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments