माझे विरंगुळ्याचे क्षण

माझे विरंगुळ्याचे क्षण…

 

 

विरंगुळा… विरंगुळा कामांमधून फुरसत मिळाली की

आणि तो काढावा लागतो कारण पुन्हा एकदा आपल्याला नवीन जोमाने उत्साह संचारला जावा यासाठी विरंगुळा हवा असतो .मला शांत बसायला आवडत आणि ते निसर्गाच्या सानिध्यात असेल तर खूपच छान .आता आमच्याकडे तसं बघायला गेलं तर समुद्र जास्त जवळ म्हणून तिथे जायला मला खूप आवडत .काही वेगळेच असते कधीकधी खूप शांत असतो तर कधी कधी तो लाटांबरोबर खेळत असतो आणि केव्हा केव्हा तर त्या लाटा त्याला जोरजोरात मारत असतात आट्यापाट्या खेळत असतात आणि तो असा उधाण येऊन रमतो. समुद्राचा काठ राहत नाही सगळी वाळू काठावरली जे काही असेल ते सगळं ओरबाडून घेऊन जातो .त्याची मस्ती कधीकधी खूपच असते गरगर फिरतो आणि मग केव्हा तरी त्याच्यामध्ये माणसांना त्याच्यामध्ये फिरवून टाकतो असा हा समुद्र पण त्याच्याशी जास्त .जवळीक नको.त्याचा नाद लागतो.त्याच्या किनाऱ्यावर बसून शांतपणे न्याहळण यात खूप मजा येते .त्या समुद्र काठावरच्या बोटी आणि गेलेल्या पोटी पाण्यात आणि त्या उन्हात चमचमणारं समुद्राचा पाणी .

संध्याकाळ झाली की सूर्याचे सगळे रंग झिरपून घेणार ते पाणी आणि काळोखा मध्ये गडत अंधारात अंगावर येणारं ते पाणी घाबरून टाकणार असते कधीकधी .पण तरीही त्याचा शांतपणा अथांग पणा खूप खूप मनाला भावतो आणि म्हणूनच माझा विरंगुळा मी समुद्रकिनारा वरच घालवते .या विरंगुळा मध्ये मला खूप काही सुचतं खुप म्हणजे खुपच कधी लिखाण तर कधी कविता कधी सगळंच नवीन. एक प्रकारची ना चेतना जागवत आणि त्या चैतन्यामुळे आपण भरभरून पुन्हा काम करण्यासाठी तयार होतो .समुद्र माझा जिवलग मित्र आहे कारण मनावरचा ताण असेल तोही घालवणारा असा हा समुद्र .मी जेव्हा गोंधळलेली किंवा खूप त्रासलेली दमलेली असते तेंव्हा समुद्रावर जाते .मन शांत शांत होऊन जातं .कशाला हवय इतर मनोरंजन त्याच्याकडे एकटक बघत राहावं आणि त्याच्या मध्येच रमून जाव.थोडफार त्याच्यात भिजाव आणि तनमनाला ओल चिंब करावं.

पुन्हा पुन्हा…त्याचा ठाव घेत जाव

 

प्रतिभा बोमाझार्डे

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments