ती अधिकारी

ती अधिकारी

 

 

मंगलची आज नेहमीप्रमाणे ट्रेनची वेळ चुकली

करणार काय? घरी एवढी गडबड आणि इतका कामाचा पसारा समोर दिसत असून सुद्धा कोणी न आवरणारा आणि त्या गडबडीतच राहुलचं म्हणजे तिचा नव्हरा…मला हे दे मला ते दे त्याच्या सर्व डिमांड पूर्ण करायच्या नंतर तिचे लेकरू स्वप्निल बापाच्या वळणावर गेलेलं .काहीही न करणारा.. उचलणारा.. पाणी तिच्याकडून मागून पिणारा .तिने कपडे काढून ठेवले तरच ते कपडे घालणारा आणि आंघोळीचा सतत पाठपुरावा केला तरच तो करणारा असा आणि सासु तिची भुणभुण तर नेहमीचीच

सासु सुनेचं नाते कधीही आई लेकी सारखं नसतेच

कितीही म्हटलं तरी ते अगदी खरं असतं कारलं कडू ते कडूच साखरेत घोळले तुपात तळले तरी ते थोडेफार आपला कडवटपणा दाखवतो आणि त्यानंतर नणंद बाई चा फोन मी किती हुशार आहे मी किती चांगली आहे हे सतत दाखवणारा टोचून टोचून बोलणारा असा तो कुचकट फोन .आता ऑफिसर झाले यात माझी काय चूक होती का मला खूप आवडायचं ऑफिस मध्ये. ऑफिसर होऊ नये म्हणून सर्वांचीच पराकाष्ठा आणि त्या जबाबदाऱ्या सांभाळून काम करणे मला खूप आवडायचं .प्रत्येक वेळी काही पुरुषांनीच मक्ता घेतला का म्हणूनच मी जिद्दीने परीक्षा दिली पास झाले मुलाखतीमध्ये पण पास झाले आणि ऑफिसर झाले. पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये भेद आहेत तिला घरामध्ये थोडं का होईना बघावं लागतं त्यामुळेच तिची घुसमट होते आणि आपले शंभर टक्के कामामध्ये देऊ शकत नाही तरीही तारेवरची कसरत करत राहते आणि मग शेवटी प्रकृतीवर होणारा परिणाम त्याच्या कडे होणारे दुर्लक्ष या स्त्रीच्या व्यथा कशा कोणाला कळणार .

समानता सर्वांनाच पण पुरुष अजूनही पुढे येत नाहीत घरात काम करण्यासाठी. दोघांनी मिळून सांभाळायचं ही जबाबदारी त्यांना कळतच नाही .किती उच्च पदावर ती स्त्री असली तरी तिला घराकडे लक्ष द्यावं लागतं .पण पुरूषांचे मात्र तसं नसतं आणि मग तिची कुचंबणा कुणीच समजून घेत नाही .शेवटी ऑफिसमध्ये टोमणे पण ऐकवले जातात प्रमोशन घ्यायचं हौस.त्याच्यापेक्षा घरी बसा ना नवरा कमवतोय ना .पण मंगल ला काहीतरी बनायचे होतं .घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून ऑफिसमधली कामे अगदी चलाखीने करत होती आणि त्यानंतर मग काय पुढे अजून एक प्रमोशन होतं ती परीक्षेला गेली मुलाखती दिल्या आणि त्याच वेळी राहुल ला ब्लडप्रेशरचा .त्रास होऊ लागला आता मात्र मंगल हवालदिल झाली. आता मी ऑफिस काम बघू का घरात राहुल ला. त्याच्या सुट्ट्या वाढू लागल्या होत्या तो कशातच लक्ष देईना सारखी चिडचिड आणि त्याच्यामुळे घरातल वातावरण बदलून गेलं .सासू नेहमीप्रमाणेच बोलू लागली. अगं बाई सोड नोकरी घरी बस आणि शेवटी तिला नोकरी सोडावी लागली आता राहुल बरा झालाय .त्याने स्वतचा बिझनेस सुरू केला होता.त्यामुळे तो सतत बाहेर आणि तिचं लेकरू खूप वी मोठे झाले अमेरिकेला स्थायिक.सासुबाई गेल्या…. घरात कोणीच नसतं मंगल एकटीच असते ऑफिसमधल्या आठवणी घेऊन……..

 

 

 

 

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments