उन्हाळ्यातील लग्न

उई मा ..लग्न. आणि.उन्हाळ्यात

 

 

उई मा ..लग्न.. आणि उन्हाळ्यात

असे बोलून नको नको बोलत शेवटी माझ्या भाच्याचे लग्न झाले

पण लग्न त्याचे आणि गमती जमती

आमच्या. त्यातला जो कंबर मोडून केलेला कामाचा खटाटोप आणि आमंत्रणे आणि हो लग्न होतं 26 एप्रिल भर उन्हाळ्यात मग काय उन्हाळ्या मधल्या लग्नाची गोष्टच निराळी.

करतोय काय लग्नाआधीच केळवण त्यानंतरचा हळदी समारंभ संगीत समारंभ आणि शेवटी लग्न व सत्यनारायण

बाप रे काय हे कसं व्हायचं

सगळीकडे एसी पाहिजे एसी पाहिजे एसी पाहिजे असं बोलत बोलतच काम करायला सुरुवात केली

पण कसलं काय आता बाहेर पडल्यावर काही एसी असतो होय. एक मानलं की गाडीमध्ये एसी असतो पण तरीही उन्हाचे चटके सोसावे लागत होते आता बघा हा त्याला केळवणाला बोलवायचं ठरवलं आणि घरातल्या स्वयंपाक घरात काय एसी लावून काम करणार.

घामाघूम होऊन छान त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायचे म्हणजे दिव्यच. तरीही त्या पासिने की बदबुने अगरबत्ती लावून सुगंधी केलेल्या वातावरणात केळवण एकदाच आटपलं.

आता होती हळद.. जस्ट इमॅजिन बाहेर कडक उन व व हॉलमध्ये लावतोय हळद त्याला आणि आम्ही एकमेकांना हळद लावून घेतली पण त्याची गर्मी मात्र अंगात धगधगत राहिली आणि नंतर जेवणानंतर नाचाची काय हौस नाच नाच नाचलो दम दम दमलो.

पण नंतर मात्र आंघोळी केल्या तेव्हा कुठे जरा हायसं वाटलं पण तरी अंगातली उन्हाची झळ मात्र काही जात नव्हती मग थंडपेय काय आईस्क्रीम काय सरबत काय

पिऊन पिऊन घश्याची वाट लावून टाकली .आता दुसऱ्या दिवशी संगीताचा कार्यक्रम आणि आम्हा बायकांचा मेहंदीचा तेवढेच काय ते थोडावेळ थंडपणा मेंदीचा त्यातल्यात्यात गारवा

आता लग्नाचा दिवस उजाडला धाम धूम

सकाळी हॉल वर ती तयारी करून जायचं त्यात त्या बायकांच्या नऊवारी साड्या पण भारतीय परंपरा ना मग नथी चा नखरा आणि अंगभर दागिने असा सर्व साज घेऊन आमची टोळी निघाली हॉल कडे आता घामाची पर्वा नव्हती कारण मनात तनात लग्नाचा उत्साह होता हॉल जवळ आला त्या अगोदर आमच्या भाच्याला घोड्यावरती बसवलं आणि काढली वरात

मग काय आमच्या दुल्हें राजा च्या लग्नात आम्ही आवेगाने मस्त होऊन नाचलो कशाचीही पर्वा न करता घामाघूम झालो तरीही ते ऊन घाम आता काहीच वाटेनासं झालं आपली दोस्ती झाली ना त्याच्या संगे आणि मग दरवाजावरती ओवाळणी पाय धुणे हे प्रकार आटोपले आणि मग हॉलमध्ये एकदाचे शिरलो हुश हॉल मध्ये एसी होता.

आणि मग जीवाला थोडी शांतता वाटली लग्नाचे विधी सुरू झाले आणि गारवा मनात साठवून ते विधी मस्तपैकी एन्जॉय केले काही म्हणा ऊन असो पावसाळा असो वा हिवाळा लग्न सोहळा हा धमालच असतो त्याला कशाचीच पर्वा नसते कारण त्यातला तो उत्साह सर्वांवरच मात करतो तोच म्हणतो अरे जारे मी नाही घाबरत कोणाला

या सर्वांमध्ये एक सांगायचं राहिलं माझ्या भाच्याचे शेरवानी धोतर आणि रिसेप्शनचा कोट घालून त्याच्या मात्र अंगाच हिटर झालं होतं पण लग्नाच्या गडबडीत त्यानेही ते सर्व सहन केलं आणि जेव्हा नवरीला घेऊन घरी आला तेव्हा मी त्याला म्हंटलं उई मा लग्न

अरे झालंच की.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments