पहिला पाऊस

पहिला पाऊस

ऊन मी म्हणतेय…तापून जीवाची काहीली होते.
घरातला शॉवर बाथ पण पुरेसा नाही
कारण असं काहीतरी हवंय की त्याने मन तन प्रफुल्लित व्हाव.
हवेत अचानक बदल होतोय.थोडी आभाळात मळभ दिसतेय.
अचानक मातीला सुगंध येतोय आणि आणि आणि..
तो येतो… पहिला पाऊस.
त्याला इतकी घाई ना यायची
आता जून मध्ये शाळा सुरू होतात
तेंव्हा येणारा व त्या छोट्याना भिजवायला उत्सुक असणारा
कालच आला.
थोडासा..
मृदुगंध देणारा.मोहरुन टाकणारा
तन मन पुलकित करणारा
असा बरसतो आणि वेड लावून जातो
पिस लागल्याप्रमाणे मन उडू उडू होत.
चटकन येतो पटकन जातो
पण कधीही न विसरण्याजोगा
सुंदर अनुभूती देणारा
रोमरोमात भिडणारा
त्या बरसत्या जलधारा..तरंग उमटतात प्रेमाचे
कुणी जवळ असावे असे वाटणारा तो क्षण
पण तो वेडा वळिवाचा पाऊस आहे
कारण तो आला त्याने पाहिलं तो जिंकला व निघून गेला
धुंद करणारा गात्रे न गात्रे फुलवणारा
आयुष्यात एकदा तरी अनुभवावा असा हा बहरून देणारा प्रत्यय

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments