आठवणींच्या दुनियेत कधी हसू तर कधी आंसु

आठवणींच्या दुनियेत..कधी हसू तर कधी आंसू –

माणसाला मन आहे बुद्धी आहे
भावनाप्रधान असा तो आहे
म्हणूनच तो बऱ्याच गोष्टी करू शकतो लिहू शकतो वाचू शकतो आठवणींच्या जोरावर हसू शकतो रडू शकतो.
सलीम ला काल परवापर्यंत आई आहे हे माहीतच नव्हते.
कारण तो तिसरीत असताना झाडावरून पडला व त्याची स्मरणशक्ती गेली.त्यानंतर तो एका अनोळखी मुलासारखा घरात वावरत होता.
अम्मी अब्बु आणि शायरा किती प्रयत्न करत होते. शायरा तेंव्हा फक्त एक वर्षाने मोठी.
पण ती त्याची बडी अम्मुच झाली होती.तो तिला बडी अम्मी म्हणायचा कारण त्याला ती खूप प्रेमाने सांभाळत होती.पण त्याला हे लक्षात नव्हते ती त्याची सख्खी बहीण आहे.
तेंव्हापासून शायरा सलीम साठी रोजा करत होती.
त्याला भरवल्याशिवाय जेवत नसे.
आज सर्व आठवणी जाग्या झाल्या तिच्या
कारण आज ती हे घर सोडून जाणार होती.
निकाह होता तिचा.
एकदा अम्मी अब्बू बाहेर गेले होते सलीम ने.तिचे पुस्तक फाडले होते.
पण अब्बु ना समजायला नको म्हणून तिने ते पुस्तक त्या कमी वेळात त्याचे पान न पान नीट चिटकवून ठेवले व सलिमला रबडी बनवून खायला घालून झोपवले होते.
तो तिला बहीण मानत नसला तरी त्याला पण ती खूप आवडायची.कधीतरी तिची वेणी फणी करायचा.
तिच्या सर्व कामात तिला मदत करायचा.
पण कधी कधी गोंधळ घालून रडवायचा पण.
डोक्यावर पडल्याने अभ्यासात गती कमीच होती
पण शायराने नेटाने बसून त्याच्याकडून अभ्यास करून घेतला
आज तो कॉलेज मध्ये जातोय.हमेशा फर्स्ट क्लास मिळतोय.
शायरा खूप खुश होती.
शायराने त्याला अम्मी अब्बु ची नावे शिकवली होती आणि म्हणूनच तो त्यांना अम्मी अब्बु अशी हाक मारायचा पण तरीही सलीम तीन वर्षांपूर्वीचा काही वेगळाच होता .अम्मी शिवाय न राहणारा आणि
आब्बु च्या मागे लागणारा .सलीम खूप बदलला होता एका कोपऱ्यात बसू लागला होता तासन तास
पण शायराने मात्र त्याला माणसात आणलं. जरी त्याच्या आठवणी नव्हत्या तरी तो त्या घरात रुळू लागला होता
शायराच्या डोळ्यात रडू आलं कारण तिच्या निकाहाची तारीख ठरली त्याच वेळी सलीम कॉलेज मधून येत असताना त्याला एक गाडीने धडक दिली होती आणि त्याच्या डोक्याला मार लागला होता आणि तो बेशुद्ध झाला होता
जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा तो तीन वर्षांपूर्वीचा सलीम होता अम्मीच्या गळ्यात पडून रडू लागला अब्बु ला अबु करून बोलू लागला यादरम्यान त्याने शायराला आता पुन्हा ओळखलंच नाही
मग काय शायरा रडू लागली. आता काय इतक्या वर्षाचा माझा सलीम बरोबरचा प्रवास संपला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली पण जेव्हा तो घरी आला आणि ही सगळी खेळणी त्याची ती खोली आणि त्याची पुस्तके हे सर्व पाहिलं तेव्हा त्याला काहीतरी आठवलं की आपण एका मुली बरोबर रोज खेळायचो तिच्या बरोबर मस्ती करायचं तीच आपल्याला भरवायची तिनेच आपल्याला मोठं केलं कोण असेल ती तेव्हा त्याच्या आम्मी ला त्याने विचारलं .अम्मी म्हणाली व कोई और नही शायरा आहे तेरी बहन . उसने तुझे बहुत प्यार दिया और इसीलिए तू इतना प्यारा बेटा हो गया है. शायराने सलिमच्या डोळ्यात अश्रू होते पाहिले तीने सलीमला थोपटले आणि सांगितले काही झालं नाही आता तू चांगला झालास. तुला सगळं आठवलं या आठवणीत मला रडू दिलं मला हसू दिलं हेच खूप महत्त्वाचं आता मी जाईन पण तुझ्या सोबत च्या आठवणी घेऊन जाईन.

  • प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments