तिरांग्या चे अंतरंग

केशरी हिरवा पांढरा

तिरंग्याचे तीन रंग

आता तरी जाणून घ्या

तिरंग्याचे अंतरंग..

ब्रीद आहे तिरंग्याचे

दया-क्षमा-शांती

याला तर केव्हाच दिली आहे

आम्ही मूठमाती…

आज आमच्यात टिळकांची आक्रमकता नाही

सावरकरांची देशभक्ती नाही

गांधीजींची भूतदया नाही

सत्तेसाठी  स्वार्थासाठी आम्ही झपाटत चाललो

एकमेकांचे लचके तोडत चाललो…

( तिरंगा म्हणतो )

वर्षातून एक दिवस घालवता

तुम्ही माझ्यासाठी वाया

आता मला नको

तुमची ती बेगडी माया…

आपसातील कलहाला

लावा आता सुरुंग

आता तरी जाणून घ्या

तिरंग्याचे अंतरंग…

तिरंग्याचे अंतरंग…

सौ प्रभा रमेश जोशी

शेअर करा..

guest
3 Comments
Inline Feedbacks
View all comments
Vilas Joshi

Sunder

Radha Hastak

Very nice …Proud of you Aai!!!

Meenal Bokare

Khup apratim Rashtraprem jaghari kavita