परमात्मा 🙏

आपण सगळेच भूगोलात शिकलो आहोत, पृथ्वीचा आस कललेला आहे. तो कललेले नसता तर… तर विषुववृत्ताचा जळून कोळसा झाला असता आणि उत्तर- दक्षिण ध्रुव गोठून गेले असते. बाकी ठिकाणांचे काय झाले असते कल्पनाच नको.

पण तसे झाले नाहीये कारण तो, जगन्नीयंता !!!

त्याने तसे होऊन दिले नाहीये. त्याने सगळे कसे आखीवरेखीव मांडून ठेवले आहे .

अगदी,ओळीत-नीटनीटके !!!

एक व्हिडिओ पाहिला होता, आकाशगंगे पासून सुरुवात करत करत लहान लहान होत शेवटी मुंगी एवढासा मनुष्यप्राणी !!!!!

कित्ती छोट्टासा जीव पण गमजा केवढ्या ????

कधी असा व्हिडिओ बघितला की अचंबा वाटतो व थक्क व्हायला होते या सगळ्या अफाटतेने !!! कमाल वाटते हे सगळेच बनवणाऱ्या परमात्म्याची 🙏

आपण आपल्यातच,आपल्या छोट्याशा विश्वातच इतके गर्क असतो की ह्या सगळ्याची जाणीवच नसते, कृतज्ञता नसते.

बघा विचार करून किती अनभिज्ञ असतो आपण आपल्या आजूबाजूच्या कितीतरी गोष्टींबद्दल. आपल्या लक्षातच येत नाहीत.

अगदी ब्रम्हांडापासून सुरवात करत चंद्रापर्यंत !!! कसा अगदी तो योग्य अँगल ने फिरवत ठेवला आहे, योग्य गुरुत्वाकर्षणात, भरती-ओहोटी च्या टाईमटेबलात…

निसर्ग, पाने, फुले, पशु-पक्षी, वनस्पती अजून काय काय यांची तर तुलनाच करणे कठीण अशी अदाकारी !!!!!

स्वतःकडे बघूयात एकदा, प्रत्येक माणसाच्या डोळ्यांचे व सुक्ष्म असे बोटांवरचे ठसे वेगवेगळे !! कोण किमयागार हा परमात्मा, अगम्य असा !!!!

विश्वनिर्मिती पासून विचार करता करता पंचमहाभूतांचा आवाका पहा. बाहेरचे विश्व पंचमहाभूतात्मक म्हणून त्या प्रत्येक महाभूताशी संपर्क ठेवणारे एकेक इंद्रिय !!! केवळ लाजवाब कलाकृती !! धन्य झालो आहोत आपण !!

कानांचा संबंध आकाशाशी येतो. वायूचा संबंध त्वचेशी, नेत्रांचा तेजाशी, आपतत्वाचा जिभेने व पृथ्वीचा नाकाने संबंध येतो.

नाक कधी ऐकण्याचे काम करील?? नो, नेव्हर !!!!

ठरवून दिले आहे तेच काम तसेच होणार हे नक्की !!!!!

आणि आपला एवढासा क्षुद्र जीव पण आपण स्वतःला काय समजत असतो ?????

कृतज्ञ राहूयात त्या कमलाकराशी, ज्याने अनंत हस्तांनी आपल्याला देवून ठेवले आहे, खूप खूप काही ज्याची उतराई होणे कधीच शक्य नाही. !!!!!

‘त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का?’ हे गाणे पुन्हा एकदा डोळे मिटून, शांत बसून ऐकाल का प्लीज… या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करण्यासाठी ??? 🙏

वीणा कुलकर्णी

वीणा कुलकर्णी

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments