फापट पसारा

फापटपसारा
काल परवापर्यंत आई बाबांचा सतत ओरडा खाल्ला…ह्या फापट पसाऱ्याबद्दल.
आणि आज मलाच तो आवरेनासा झालाय.
भांड्यांपासून… धान्य
नंतर कपड्यांपासून…दागिने
बेडशीट चादरी उश्या त्यांची कवर्स
सजावटीचे सामान
किती तरी
उगीच जीव लावून कुरवाळत बाळगायचे.. व नंतर त्याचाच पसारा
आता घर म्हंटले की होणारच अशी सर्वसामान्य भाबडी समजूत.
पण वस्तू गोळा करण्यासाठी काही मर्यादा??? छया..
म्हणतात माणूस येताना एकटाच उघडा नागडा दुनियेत येतो
व जाताना …माहीत सर्व काही आहे
जातानाही तो तसाच जातो.
पण माया मोह लोभ..शेवटी अतिरेक
म्हणूनच हा फापट पसारा.
आता नात्यांचे पण बघा हं
आई वडील भावू बहीण
चुलत मावस.. आत्येकडील….
मित्र मैत्रिणी…
इतकी पुरी नाही का
पण अजून. सोस आहे ना
मग सोशल साईट्स चे फ्रेंड्स
सगळाच गोतावळयात बुडून पाणी डोक्यावरून जातंय.
तरी हा फापट पसारा काही आवरावासा वाटत नाही
स्वतःला जेंव्हा असुरक्षित वाटू लागते ना तेंव्हाच ह्या पसाऱ्याचा मोह असतो.
खर तर मूलभूत गरजा खूप कमी असतात पण वाढवून ठेवतो व त्या पसाऱ्यात स्वतःला रमवतो.
आणि मग त्याच्याशिवाय
करमत नाही.
त्या चिखलात लोळणाऱ्या डूकराप्रमाणे अवस्था प्राप्त करून त्यातच डुंबवतो.
नंतर हाच पसारा कुणी कचऱ्यात फेकतो किंवा कुणी पुन्हा तोच वाढवतो…

पण पसारा तो पसाराच…
प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Ujwala Sunil Ajgaonkar

मनुष्यप्राणी हा कधीच समाधानी नसतो.एकाच गोष्टीत गुंतून राहायला त्याला आवडत नाही.निरनिराळ्या गोष्टीचा/वस्तूंचा अनुभव घ्यायला त्याला आवडते. नवनवीन शिकायला आवडते .म्ह णूनच हा फापट पसारा!!