गूळ पानी

ओ पावनं.. कुठं चाललास बिगी बीगी
अव अव वाईच थांबा की.
ओ पावनं अवो पावन लैच पळून लागले की
किसन मागून हाका मारून राहिला पन त्यो काय
थांबना.
पावनं सूर्या माथ्यावर आग ओकून राहिलाय म्हून शान सांगतोय गूळ पानी खावून जावा की.
सरत शेवटी किसन बी पावन्या संग धावू लागला.
आवो असं काय झालंया तरा तरां चालया.
पावना बोललं अव किसनराव काय इचारू नगा.
समदा इभ्रतीचा गोंधुळ झालाव.
आमची सुमन कालपासून दिसनाशी झालीय.
अवो समद्या गावात हुडकली पन कुठं गावना.
आता पोलिस पाटलाला सांगावं तर उगा पंचनामा आनी नसता ताप. वर समदिकड
बोंबाबोंब म्हून गपगुमान तिला हुडकतोय.
पर पावनं अशी कुठं गेली असल.
तर काय सांगू किसनराव परवा जत्रला तिला घेवुन गेलं व्हतं.तर तिथं रघ्या भेटला व्हता.
दोघांमध्ये झ्याटिंग झालं असल.मला तर त्या रघ्याचा डावुट येतोय.
पर पावनं राघ्या तर लैच आडदांड हाय नव्हं का
आन आपली सुमन तर फुला वानी हाय जनु.
व्हय तर आव तेच तर लागून राहिलया.
मंग आता काय करावं बरं.
आता काय दोघं राजी असल तर म्या काजी काय व्ह करनार.
दोघांना बी घेवुन येतो घरला आन दावणीला बांधतो एकाच.
रघ्या च पैक द्यावं लागतील बास.
किसनराव मग सुमनला रेडकू झालं की मंग
मात्र चिक घेवुन येईल तुमच्याकड निवांत गुळ पाणी खायला.
तशी आता सुमन दूध भी लई देतीय.
आन रघ्याला लावू शेतकामाच्या नांगराला.
काय ..

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
प्रवीण

शेवटचा ट्विस्ट छान आहे.