वेडी आई

तु माझ्यासाठी काय केलंस??
सर्वसाधरणपणे मुलांचा पालकांना प्रश्न
हाच प्रश्न सविताने आईला केला.
आई बोलली माया केली ममतेने वाढवले
दुखले खुपले तुझी रात्र जागून काळजी केली व तुला ठणठणीत केले…पण हे सर्व मनातच बोलली आई.
कारण काही बोलणं म्हणजे उगीच वाद वाढवण होतं आणि डोळ्यातही पाणी न आणून देणं हे अपेक्षित होतं.
मुकाट्याने आई कामाला लागली.
सविता मोबाईल मध्ये गुर्फटली नेहमीप्रमाणे.
आणि थोड्या वेळाने भूक लागली म्हणत आली आईकडे.
कॉलेज ला जाणारी लेक… दमत असेल बिचारी
आणि आजकालचा अभ्यास.. बाई ग
किती तो…
शिवाय इतर व्याप आहेतच..
कबड्डी काय गाणे काय नाच शिवाय अभिनय पण..
गुणाची ग पोरगी माझी
आई कौतुकात बुडाली.
दिवस जात होते… प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जात होता..तू माझ्या साठी काय केलंस.
सलत होता..कुरतडून काढत होता.
पण पुन्हा तेच.. मनात तो दुःखद क्षण विरून टाकायचा..आणि कामाला सुरुवात.
आज सविता आई झाली होती.
सविताची आई नातीच्या पाचव्या वाढदवसानिमित्त लेकिकडे आली होती.मदत करायला.
वाढदिवस कार्यक्रम चालू होता तितक्यात नातीचा आणि लेकीचा वाद सुरू झाला
माघार कोणी घेत नव्हत
नात बोलली मम्मी तू माझ्यासाठी काय केलेस
माझी मी वाढले अभ्यास मी केला
तु फक्त जेवण दिलेस पण ते तर तुझी ड्यूटी होती.
मी ना आता सेपरेट राहीन.
फक्त पांच वर्षाची नात वेगळे राहायचे होते तिला
लेक नाही थांबू शकली डोळ्यातले अश्रू
बांध फोडून घडाघडा बोलत गेली

पण नंतर तिच्या आईने तिला थांबवले तेव्हा मात्र आईच्या डोळ्याला डोळा नाही भिडवू शकली.
तिला तिचे शब्द आठवले..इतिहासाची पुनरावृत्ती..
पण आई नेहमीच गप्प असायची.
आईच्या गळ्यात पडून रडली.
आई तू कसे काय सहन केलास माझा जाच.
आई थोर तू धन्य तू
मला पण तुझ्यासारखी आई व्हायला शिकव ना…

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

guest
2 Comments
Inline Feedbacks
View all comments
Ujwala Sunil Ajgaonkar

सुरवातीपासून शेवट पर्यंत आई ही आईच असते. लेखन खूप छान!!