हितगूज

हितगुज..
🎋 पहाटे मंद वारा श्वासात आणि कोकीळ कूजन कानात साठवत मी झुल्यावर झुलत ..मेथी निवडत होते..

समोर पूर्वेला तांबडं फुटलं.. सान पाखरांना कंठ फुटले.. एक चिमण थवा..रोजच्या सवयीनुसार आमच्या सज्जात आला.. आणि

टेबलावर ऐटीत बसत.. तुरुतुरु चालत..लुटुलुटु माना वेळावत..डोळे गरगर फिरवत.. गोल..गोल गिरकत.. घुमत.. चिवचिवत.. मी ठेवलेले तांदूळ दाणे टिपू लागला….. टकटक आवाज करत ..दाणे टिपून भुर्रकन उडून गेला..

एक गुबगुबीत *चिऊताई* मात्र रेंगाळली. माझ्याकडे टकमक पहात बोलू लागली..

“‘ काकू.. मी तुमच्या घरात राहू?
*मी गर्भवती आहे.*
या काळात उंच भरारी घेणे जमत नाही..
पण.. मानवाने टाकलेले अन्न आम्ही सेवन करतो.
गर्भवती ,आजारी, वयोवृद्ध पक्षी उंच भरारी न मारता..

बागेत.. मंदिराच्या बाहेर ,शाळा..काँलेजात ,टेकडीवर.,वाहनांवर, रस्त्यावर.. तर.. अनेक चाट भांडारे..गाड्या.. असतात..

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यालयात.. तुम्ही मानव थाळीत इतके अन्न टाकता.. त्यावर आमच्या अख्ख्या पक्षीजगताचे पोट भरते..
दवाखान्यात.. तर आजकाल रूग्णांना कँन्टीनचेच तळकट..तुपट खायला देतात.. रुग्ण ते सर्व टाकून देतात.. आमची चंगळ होते..

मानवाच्या टाकण्याच्या सवयीमुळे आता आम्हाला पण शिजवलेले मसालेदार पदार्थ खायची सवय झाली आहे.

हल्ली आम्ही कच्चे तांदूळ.. आळ्या.. किडे खात नाही..त्यातून मी गर्भवती..मला रोज शिजवलेला भात द्याल ?

सध्या *लाँक डाऊन* काळात मानव घरात बसून आहे..

बागेत.. कार्यालयात.. कुठेही कुणी अन्न टाकत नाही. त्यामुळे आम्हा.. भटक्या पशुपाखरांची उपासमार होते आहे.

पाळीव पशुधनाचे लाड त्यांचे मालक पुरवतात..

पण.. आम्ही भटके.. स्वच्छंदी ..आमचे चोजले सध्या पुरवले जात नाहीत..
***भारतीयांनी स्वच्छता तंत्र आत्मसात केले.. तर ..आमचे काय?

परवा.. कार्यालयाजवळ झाडाखाली… एक गाय केविलवाणा हंबरडा फोडत होती.
आम्ही सर्वांनी चोचीतुन तिला गवत दिले..

पण..ती म्हणाली..

“‘ माणसने फेकून दिलेले फास्ट फूड.. चाट.. विशेषतः गोलगप्पे..आईसकँडी.. आईसक्रीम..
याची चटक लागली आहे मला.. तेच हवे..””

एका गर्भवती ची दर्दभरी कहाणी ऐकून मी सुन्न झाले..

असो..

कुंडीतील टपोरा.. हासरा मोगरा घमघमत गाण्याची फर्माईश करत होता..
त्याच्या जवळ जात.. त्याच्या साठी केलेली ज्ञानीयांची रचना..मी गुणगणू लागले..

**मोगरा फुलला* —

धन्यवाद 🙋🏼

उन्नती गाडगीळ🌹🙏

Unnatti Dattatray Gadgil

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments