मातृदिनाच्या शुभेच्छा

प्रेम आणि वात्सल्याची सदैव मूर्ती आहेस तू,
क्षणाक्षणाला हात देणारी शक्ती आहेस तू,
संकटांची मालिका कितीही असो शिरावर,
संकटाना छेद देणारी, चेतना आहेस तू,
घर आणि उंबरा इथला, असेल कधी अडचणीत,
अडचणींची चिंता मिटविणारी, माया आहेस तू,
वीज आणि विजेरीसारखी विद्युल्लता आहेस तू,
साम दाम दंड भेद, शिस्तीसाठी वापरतेस,
वावरताना समाजाची आई होतेस कधी तू,
घरावरती असेल कुणाची वाकडी नजर जेव्हां,
दृष्ट काढून घराची, मिठ मिरची फेकतेस तू,
कुटुंबाचा आधार आणि, कुटुंबाचा स्तंभ तू,
जग सारे समजावणारी, अनुभवाची शिदोरी तू,
आई, माता, अम्मा मा, सर्व जगाची शान तू,
अशी या मातृदिनाची, सदैव जननी तू….
==========================
@अरविंद कुलकर्णी, इचलकरंजी.
दिनांक 08/05/2022 मातृदिन.
==========================

अरविंद व्यंकटेश कुलकर्णी

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments