रमाबाई

चोवीस तास झाले, आबासाहेब छताकडे डोळे लावून वाट पहात होते.बुधवारी फोन केला होता, आज शनिवार आला.माधव लगेच निघाला असेल तर अजून कसा आला नाही? भोपाळहून मुंबईला यायला इतका वेळ ? आबासाहेबांना ’माधवच्या येण्याला वेळ का लागला याच कोड पडल होत तर, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर ’मात्र आबासाहेबांच्या नियंत्रणात न येणार्या ब्लड प्रेशरवर उपाय शोधण्यात व्यग्र‘ होते. बाहेर आबासाहेबांची पत्नी रमाबाई, नवर्यापचे नियंत्रणात न येणारे ब्लड प्रेशर आणि मुलाला भोपाळहून यायला लागणारा वेळ अशा दुहेरी टेन्शनशी लढताना आबासाहेबांचे औषधपाणी आणि धावाधाव करताना थकून गेली होती. वयाची साठी गाठलेली रमाबाई, आत पासस्ठाव्या वर्षी मरणाच्या उंबरठ्यावर उभे असतानाच केवळ आपल्या विल पॉवरवर स्वत:ला कसेतरी जगवणार्या आबासाहेबांना वाचविण्यासाठी वय विसरुन धावत होती. थकलेल्या शरीराला आधार देताना ’माधव येईल आणि सारे सुरळीत होईल अशी आशा मनाला लावून सुखावतही होती.
आजचा दिवसही गेला वाटत ? आता कुठचा येतोय माधव ? संध्याकाळ होत आली, आजही रात्र एकटीलाच काढावी लागेल,असं दिसतेय ? असा विचार मनाशी करत रमाबाईनी एक दीर्घ श्वा स सोडला आणि त्या व्हरांड्यातल्या बाकाकडे पाहू लागल्या. क्षणभर टेकावं असा विचार त्यांच्या मनात आला खरा पण, बाकावर गर्दी होती. प्रत्येकाचाच सीरीयस पेशंट आत इन्सेंटीव्ह केअर युनिटमध्ये होता. कुणी कुणाला उठ म्हणायच,आणि कुणी कुणाला जागा द्यायची ? सगळेच आतल्या निरोपाचे टेन्शन वागवत आला दिवस ढकलत होते. रात्री पाठ टेकवत होते पण डोळे उघडे ठेवत होते आणि दिवसा त्या बाकड्याच्या आश्रयाने थकलेल्या शरीराला सावरत होते. रमाबाईंच्या थकलेल्या शरीराची घालमेल त्या गर्दीतही आनंदने टिपली. आयसीयूत अगदी घटका मोजणारी आईच उभी आहे असा भास त्याला झाला आणि तो ताडकन् उठला.
“बसा…!!”,
आनंदकडं अगदी समाधानानं पहात रमाबाई त्या मोकळ्या जागेकडं अक्षरश: धावल्या. थकलेल्या शरीराला त्या बाकावरच्या गर्दीत कसेतरी ढकलत त्यांनी आनंदकडं एकदा कटाक्ष टाकला. रमाबाईंच्या चेहर्याचवरचे समाधान आनंदला सुखावून गेलं.माधवचा विचार बाजूला सरकवून रमाबाईही कौतुकानं आनंदच आणि त्याच्या ’मामांचं बोलणं कान देऊन ऐकू लागल्या.
‘‘ खरं सांगू का ? यांनी पेशंटची चांगली सोय केलीय पण, बरोबरच्या लोकांसाठी काहीतरी सोय करायला नको का हो ? असं व्हरांड्यात दिवस काढायचे म्हणजे आतल्या पेशंटच्या शेजारी काही दिवसानं आपली जागा बुक केल्यातला प्रकार आहे.’’ आपल्या त्रासिक भावनांना रमाबाईंनी एकदा मोकळी वाट दिली आणि आपल्याला जागा देणार्या आनंदशी संवाद साधण्याची संधी अगदी बरोबर साधली.
मामांशी असलेलं बोलणं अर्ध्यात तुटलं, पण आनंदला राग आला नाही. मामाही शांतच होते. कदाचित गेले काही दिवस मनाशी डाचणारं रमाबाईंच्या मुखातून ऐकल्यानं त्यांनाही एकटेपण संपलं असं वाटलं असावं. क्षणभरचं पण, एका अनोख्या अबोल्याचा अनुभव तिघांनीही घेतला.आपलं बोलणं यांना आवडलं नाही असं वाटून रमाबाई काही बोलणार इतक्यात अनाऊन्समेंट झाली,
‘‘आबासाहेबके सगेवाले,……….आबासाहेबके सगेवाले………..अंदर आओ.’’
रमाबाईंच्या छातीत धस्स झालं. आत काय आहे माहित नाही. ऐकायला काय मि’ळणार माहित नाही. टाळता येणार नाही, आत तर जावेच लागेल, काय सांगतात ते ऐकावेच लागेल. काय असेल ? औषधे हवी असतील का ? की……. माधव येईल या आशेवर तगून राहीलेले आबासाहेब …???
मन चिंती ते वैरीही न चिंती म्हणतात ना ? रमाबाईंच्या मनात अनेक विचार थैमान घालत होते. कसेबसे स्वत:ला सावस्र्न रमाबाई धावतच आत गेल्या.बाहेरचे वातावरण एकदम तणावाचं झालं. काय झाल असेल ? प्रत्येकाच्या चेहर्या्वर एकच भावना होती. आज आबासाहेब…… उद्या कोण, की आपला पेशंट ? सगळ्यांच्याच मनात या भीतीचं काहूर उठलं होतं. आयसीयूचं दार कधी उघडतं आणि आतून रमाबाई कशा येतात याकडे डोळे लावून प्रत्येकजण बसला होता.
आणि आयसीयूचं दार उघडलं, रमाबाई धावतच बाहेर आल्या. त्यांची ती धावपळ बघून बाहेरची अस्वस्थता आणखी वाढली. एकदोघे तर न कळत उठून उभे राहिले.
‘‘अहो, कुणीतरी आत चला, यांना उठवून खाली खुर्चीत बसवायला सांगितलयं डॉक्टरनी…’’
. सगळीकडे शांतता पसरली. खुर्चीत बसवायला सांगितलय …. आयसीयुतल्या पेशंटला ? कुणालाच काही समजले नाही. पण, डॉक्टरपेक्षा आपण शहाणे नाही, असा सोयीस्कर विचार कस्र्न प्रत्येकाने आपल्या मनातील हे वादळ परस्परच शमवलं. आता प्रश्नी होता रमाबाईना मदत कुणी करायची ? आयसीयुतील पेशंटला खाली खुर्चीत बसविण्याचे धाडस कुणी करायचे ? अवघ्या दोन मि’निटात सगळं शांत झाल. रमाबाई सगळ्यांकडे आशाळभूतपणे पहात होत्या.
काय झालं कळलं नाही, पण आनंद आणि मामा दोघांनीही परस्परांकडं पाहिलं. त्यांच्या अबोल नजरांनी परस्परांना काही तरी सांगितलं आणि क्षणार्धात दोघे आयसीयूकडे धावले. आत आबासाहेब वाटच पहात होते. वॉर्डबॉयच्या मदतीनं आनंद आणि मामानी आबासाहेबांना खुर्चीत बसवलं. रमाबाई मागे उभ्या होत्याच. काम संपताच आनंदनं आपल आईकडं एक नजर टाकली. चारपाच खाटांच पलिकडं असलेली आनंदची आई पहात होती. शेजारच्या रुग्णाला आपल्या पोरानं आणि भावानं केलेली मदत त्या स्थितीतही तिला आवडली. तिच्या चेह-यावर एक समाधान पसरलं. आईला काही हवय का हे आनंदनं खुणेनंच विचारलं कारण ’मेंदूचं ऑपरेशन झाल्यानं तिच्या जवळ जायला बंदी होती. आईनंही तिथनच काही नको असं सांगितलं आणि बाहेर जाणसाठी आनंद वळताच आबासाहेबांनी केलेल्या मदतीचे हलकेच हसून कौतुकही केलं. आनंद आणि मामा बाहेर आले. बाहेरचं बाकडं तसंच माणसांचं ओझं सहन करत होतं आणि त्यावर रमाबाईही बसल्या होत्या.
पोटचा पोरगा अजून आला नाही, त्याळे बाकीच्यांना त्रास होतो, असा अपराधी भाव त्यांच्या चेह-यावर स्पष्ट जाणवत होता. माधव येण्याची शक्यता आता मावळली होती. आजची रात्रही आता एकटीलाच काढावी लागणार या भावनेनं ती अस्वस्थ झाली होती. मनात एकाच प्रश्नाने एकसारखे थैमान ’मांडले होते,
‘‘ माझा माधव अजून कसा आला नाही ? त्याचा फोनही नाही. आपण लावला तर लागतही नाही. काय झालं असेल ?’’ रमाबाईंच्या मनातील काळजीसारखाच हळूहळू बाहेर अंधारही गडद होत गेला आणि बाकावरुन खाली येऊन रमाबाई त्या व्हरांड्यात आडव्या झाल्या. सुदैवानं त्या रात्री आबासाहेबांच्या ब्लडप्रेशरनं रमाबाईंना त्रास दिला नाही. आत सलाईनची ऊर्जा रक्तात सामावून घेत आबासाहेबांनी आणि बाहेर दोन्ही काळज्यांना सांभाळत रमाबाईनी ती रात्र घालवली.
सकाळ होताच नेहमीच्या गडबडीनं सूर्याचं स्वागत केलं. व्हरांड्यातील फरशी पुसणारे, ड्यूटी संपवून चाललेले आणि ड्यूटीवर हजर होणसाठी लगबग करत असलेले अशा नेहमीच्या गलक्यात दिवसभराच्या धावपळीसाठी पुन्हा सज्ज होत त्या व्हरांड्यातील रुग्णांचे नातेवाईक आपापल्या पथा-या गुंडाळू लागले. रात्रीत हे जग सोडून गेलेले पेशंट, त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आपल्या पेशंटची काळजी, या सगळ्यातून जी एक दोन तासाची झोप मिळाली त्यातच समधान मानत आनंद आणि मामाही उठले. पथारी गुंडाळता गुंडाळताच आनंदच लक्ष रमाबाईंचकडं गेलं. तसल्या धामधुमीतही हातात जपमाळ घेऊन त्या देवाचं नाव घेत होत्या आणि पतीला बरं करण्याच आणि मुलगा लवकर यावा याचं, असं दुहेरी साकडं त्या परमेश्वलराला घालत होत्या. त्यांची माळ जेमतेम निम्म्यावर आली असेल इतक्यात त्यांच्या पर्समधला मोबाईल वाजला. जपमाळ हातात तशीच सावरत त्यांनी ’मोबाईल काढला आणि पाहिला मात्र त्यांच्या त्या कोमेजत चाललेल्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. ज्याची त्या जिवापाड वाट पहात होत्या त्या माधवचा फोन होता.
‘‘ हा माधव ! बोल….’’ रमाबाईंचा आनंद त्यांच्या शब्दात डोकावत होता. त्यांना आधार देणारं हक्काचं माणूस त्यांना भेटणार होतं.
‘‘ आई, मी पोहोचतो तासाभरात मुंबईत…….. ! ’माधवनं एकदा आईच्या मनावरचं मणाचं ओझं हलकं केलं.
‘‘ आता पक्त एक तास….. माधव ेईल, माझी धावपळ संपेल. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडता येईल. आत शेवटचा श्वासस घेणा-या बापाला पोराची भेट घेता येईल. जमलंच तर त्याच्या मांडीवर डोकंही ठेवता येईल. अगदीच नाही तरी मरताना पोटच्या गोळ्याचा हात तरी हातात असेल…… रमाबाई चपापल्या. मनातल्या मनात मी हा का विचार करते ? असं काही होणार नाही…. माधवला पाहताच हे उठून बसतील. फार जीव आहे त्यांचा त्याच्यावर. सारखं माधव …माधव म्हणतात काल पासून. तो आल्यावर ते बरे होतील. डिस्चार्ज मिळेल. आपणं तिघंही घरी जाऊ. माधवला सांगू… आता नको बडोदा बाबा….. तुझ्या बाबांकडं पहावं लागणार आहे. मुंबईला बदली करुन घे.’’ रमाबाईंच्या डोक्यात विचारांचं काहूर उठलं होतं. या विचारातच किती वेळ गेला कळलं नाही. इतक्यात रमाबाईंच्या कानावर आवाज आला….‘‘ आई… कसला विचार करतेस ?’’
’माधवचा आवाज…. हो माधवच आला……रमाबाईंनी दचकून पाहिलं. त्यांचा माधव त्यांच्या शेजारी उभा होता. मायलेकरांची दृष्टादृष्ट झाली मात्र…. रमाबाईंचा बांध फुटला. माधवच्या गळ्यात हात टाकून त्यांनी आपल्या हुंदक्यांना आणि अश्रूंना वाट करुन दिली. रडणा-या आईला अलगद बाजूला करतं माधवनं विचारलं, ‘‘ बाबांना कुठं ठेवलय ?’’ रमाबाईंनी पदराला डोळे पुसत समोरच्या दाराकडं बोट दाखवलं. काहीही न बालता माधव तिकडं निघून गेला. उतरणीवर पाय घसरला म्हणून कशाचा तरी आधार घ्यायला जावं आणि तोल सावरण्याच्या आधीचं तो आधार हातातून सुटावा तसं काहीसं रमाबाईंचं झालं. पण, त्या तशाच माधव परत येण्याची वाट पहात राहिल्या. साधारण पंधरा मिनिटांनी माधव बाहेर आला. मोठ्या आशेनं माधवच्या चेह-याकडं पाहणा-या रमाबाईंच्या काळजात धस्स झालं.
माधवचा चेहरा लाल बुंद झाला होता. तो तडक आईच्या समोर आला. आजूबाजूला असणा-या कुणाचीही तमा न बाळगता तो आईला म्हणाला,… ‘‘ काय झालंय बाबांना ? चांगल छान पंधरा मिनिटे गप्पा मारल्या त्यांनी माझ्याशी….उगीचचं कशाल बोलावून घेतलंस मला ? दोन दिवसांची रजा फुकट गेली की माझी.’’
खिशातून हजाराच्या नोटांची दोन बंडलं काढून त्यानं बळेबळेच आईच्या हातात अक्षरशः कोंबली. आई काही म्हणायच आतच माधव म्हणाला, ‘‘ हे दोन लाख रुपये ठेव….बाबांचं दवाखान्याचं बिलं भागव. तुझ्या मदतीला एखादा मुलगा घे, त्याचा पगार यातून दे. मला जायला हवं…. पुढच्या आठवड्यात मला अमेरिकेला पाठवतेय कंपनी. त्यामुळं खूप काम आहे. असं आलतू फालतू कारणांसाठी रजा काढून ती संधी जाईल माझी. आता अशा किरकोळ कारणासाठी बोलावू नकोस. बाबा गेले तरच फोन कर……..! ! !’’
इतकं म्हणाला आणि आईकडं न पाहताच माधव तडक लिफ्टमध्ये निघूनही गेला. आकाशातून वीज थेट डोक्यावर कोसळावी तशी रमाबाईंची अवस्था झाली. हातातील नोटांची बंडलं गळून पडली. अजूबाजूचे सगळेच बधीर झाले. माधवचं हे वागणं कुणाच्याच लवकर पचनी पडत नव्हतं. करीअर महत्वाचं आहे पण बाप आजारी असताना निराधार आईला आधार देणारे दोन शब्दही माधवला त्यापुढं महाग वाटले की काय ? माधवला काही सांगण्यात अर्थच नव्हता. रमाबाईंना मात्र सावराला हवं होतं. मृत्यूशी झुंजणा-या आबासाहेबांचा त्याच आधार होत्या. आनंद झटकन पुढं झाला. खाली पडलेली नोटांची बंडलं त्यानं उचलली आणि रमाबाईंच्या हातात दिली. रमाबाईनी एकदा आनंदकडं पाहिलं. आईसाठी त्याची चाललेली धावपळ, तो उपाशीपोटी रात्रंदिवस करत असलेली पळापळी गेले दोन दिवस त्या पहात होत्या. त्यांनी आनंदला जवळ घेतलं. आनंदच्या खांद्यावर दोन गरम आसवांचे थेंब पडले.
‘‘ तू माझ्या पोटी का नाही जन्माला आलास बाळा ?’’ रमाबाईनी एका प्रश्ना तच मन मोकळं केलं. ‘‘ चल…माझ्यासोबत चल आत…. मला तुझ्या आईला पहायच आहे….’’ एवढं म्हणून रमाबाई थांबल्या नाहीत तर तंनी आनंदला चक्क हाताला धरुन आयसीयूत नेलं. आईच्या कॉटजवळ आनंदनं रमाबाईंना नेलं. डॉक्टर काय म्हणतील याची पर्वा न करताच त्या झटकन वाकल्या आणि त्यांनी आनंदच्या आईच्या पायावर डोकं टेकलं.
‘‘बाई फार भाग्यवान आहेस तू…. अशा मुलाला जन्म दिलास…..नाही तर मी ? यापेक्षा मी वांझोटी राहिले असते तर बरं झालं असतं. …’’ रमाबाई बोलून गेल्या. आनंदच्या आईला बाकी काही कळलं नाही पण आपल्या मुलानं काहीतरी चांगले केलं म्हणून या बाईनं आपल्या पायावर डोकं ठेवलं हे तिला समजलं. तशाही स्थितीत तिच्या डोळ्यातले ते दोन अश्रूबिंदू तिला लपवता आले नाहीत. बाजूच्या कॉटवरुन आबासाहेब हे सगळं पहात होते. त्यांना कशाचाच बोध होत नव्हता. आपल्या चिरंजीवांनी काहीतरी केलं एवढं त्यांच्या लक्षात आलं. आबासाहेबांना काही कळलं तर त्यांना त्रास होईल म्हणून रमाबाई चटकन बाहेर पडल्या आणि खिन्न मनानं त्यांनी पुन्हा त्या बाकड्याचा आधार घेतला. मामांनी धावत जाऊन कॉफी आणली. रमाबाईंना आता पोटच्या पोरापेक्षा हे सगळे जवळ वाटू लागले. मामांनी आणलेली कॉफी त्यांनी घेतली खरी… पण घोट काही घशाखाली उतरत नव्हता. त्यांनी मामांच्या अग्रहाखातर कॉफी संपवली. आता पुढे काय ? रमाबाईंच्या समोर मोठा प्रश्नी होता. डोळे मिटून त्या त्यावर विचार करत होत्या.
साधारण तास दीड तास असाच गेला आणि अनाऊन्समेंट झाली, ‘‘ आबासाहेब के सगेवाले अंदर आना…’’
रमाबाई धावतच आत गेल्या. पुन्हा सगळीकडे सन्नाटा पसरला. काय झाल असेल? प्रत्येकाच्या मनात काही ना काही विचार येत राहिले. पंधरा मिनिटं अशीच गेली आणि डोळ्याला पदर लावत रमाबाई बाहेर आल्या. सगळे उठून उभे राहिले. रमाबाईंच्या शोधक नजरेनं आनंदला बरोबर शोधलं. आनंदचं पुढं जाण्याचं धाडस होत नव्हतं. पण, रमाबाई त्याच्या जवळ पोहोचल्या. त्याचे दोन्ही हात हातात घेत त्या म्हणाल्या, बाळा….आता शेवटची मदत कर….एवढे पैसे खाली भरुन पावती घेऊन ये, म्हणजे पुढची व्यवस्था करायला बरं…… आता मलाच पहावं लागेल सगळं…….सकाळी पोरगं दुरावलं आता काळानं नवरा नेला…….. या जगात आता मी एकटीच रे……. ’’
आबासाहेब गेल्याचं सगळ्यांना कळलं. पण काय बोलाचं हे कुणालाच कळेना. रमाबाईंनी दिलेले पैसे भरुन आनंद पावती घेऊन आला. कुणीतरी रमाबाईंना म्हटलं, ‘‘ नंबर द्या … तुमच्या मुलाला कळवतो. ’’ रमाबाईंनी त्याच्याकडं पाहिलं आणि त्या ताडकन म्हणाल्या,. ‘ अजिबात नको…..त्याला बोलवाची गरज नाही…… ज्याला जिवंत बापाची किंमत नाही त्याला प्रेताची काय असणार ? ’’
आनंदनं पावती आत दिली. पांढ-या शुभ्र चादरीत गुंडाळलेला आबासाहेबांचा मृतदेह वॉर्डबॉयनं ट्रॉलीवरुन बाहेर आणला आणि रमाबाईंच्या ताब्यात दिला. सगळ्यांच्याच नजरा रमाबाई काय करतात याकडं होत्या. रमाबाईंनी एकदा त्या निश्चाल आबासाहेबांकडं पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न लावता त्या ट्रॉली ढकलत लिफ्टकडं चालू लागल्या.
त्यांच्या त्या पाठमो-या आकृतीकडं सगळं हॉस्पिटलं आवाक होऊन पहात राहिलं ……………………….! ! ! !

– आनंद कुलकर्णी

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Sampada ait jog

Khup chan