श्री रामाचा विडा

विडा घ्या हो रामराया । महाराज राजया । विडा घ्या ।।धृ।।

रत्नजडित पानदान । आली जानकी घेवून ।।
विडा देती करुनिया । दीनबंधु रामराया ।।१।।

सुगंध गंगेरी पानें । मुक्त मोतीयांचा चुना ।।
सुपारी कात गोळ्या । भक्तिभावें मेळविल्या ।.२।।

जायपत्री जायफळ । विडा जाहला सुफळ ।।
सीता रामालागीं देत । केशर कस्तुरीयुक्त ।।३।।

सीताराम विडा घेतां । ऐक्यभावें एकात्मता ।।
रंगली ऐक्यरंगी । रामदास पायां लागी ।।४।।

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments