आता पुन्हा लिहावे…….

नि:शब्ध भाव माझे, सांडून आज गेले
आता पुन्हा लिहावे, वाटून आज गेले ॥धृ ॥

मज अंतरात होती, निद्रीस्त भावना ती
अंकूर आज त्याचे, रूजवून शब्द गेले ॥

उमलून भाव आले, बहरून शब्द गेले,
ह्र् दयातल्या व्यथेचे, हरपून भान गेले ॥

सांडून शब्द झाले, रिते हळूच ओठ,
डोळे तरी अजूनी, अश्रू गिळून गेले ॥
– आनंद कुलकर्णी

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments