माफी कुणाकडे तू

तू ओंजळीत माझ्या, टाकू नकोस काही
माझे तुझ्याकडे तू, राखू नकोस काही ||

मी सोसलेत माझ्या, ह्रदयावरील घाव
अश्रू तुझे फुकाचे, सांडू नकोस काही ||

तू तोडलीस स्वप्ने, डोळ्यात पाहिलेली
डोळ्यात पाहूनीया, मागू नकोस काही ||

मी बांधलेच नव्हते, इमले मनात माझ्या
राखेत गाडलेले, शोधू नकोस काही ||

तू बोललीस आणि, धागे तुटून गेले
माफी कुणाकडे तू, मागू नकोस काही ||

– आनंद कुलकर्णी

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments