मैलाचा दगड

तुझ्या प्रत्येक आठवणीचा
एक एक धागा जपलाय
माझ्या एकेका अश्रूंमध्ये
तो अजूनही भिजलाय..।।

रडायचे नाही म्हणालीस
अन रुमाल देऊन गेलीस
आता डोळ्याच्या कडांनीही
त्याला आठवणीत बुडवलाय..।।

जाता जाता मागे वळून
फक्त एकदाच पाहिलस
तेव्हापासून माझ्या स्वप्नांचाही
मैलाचा दगड बनलाय… ।।
– आनंद कुलकर्णी

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments