वर्किंग फ्रॅाम होम

सध्याच्या “वर्किंग फ्रॅाम होम “ वर काही सुचले आहे ते शेअर करत आहे

वर्किंग फ्रॅाम होम
( संत तुकारामांच्या अभंगाच्या चालीवर वाचावे)

वाटले , सुख घरी असण्याचे । पाय पसरून बसण्याचे
ॲाफिसवेअर मध्ये नसण्याचे । होता हा भ्रम

वाय-फाय च्या नाना लहरी | हॅाट स्पॅाट चे पाय धरी
कनेक्शन न मिळे परी । हरी रे हरी

कूकरच्या शिट्ट्या, मिक्सरची घरघर | फिरतो घरभर
जणू ऋणझूणता भ्रमर | केवळ जागेसाठी

कॅाल्स ची सोंगे अनिर्बंध । न कशाचा धरबंद
तुटले वेळ काळाचे बंध | काय करावे

वेबेक्स, टीम्स आणि झूम | हीच खरी त्रिमूर्ती
बाकी सर्व मिथ्या | जाणोनी घ्यावे

वर्किंग फ्रॅाम होम । होमच्या होमपणाचा झाला होम
हीच तर खरी गोम | कुणा न कळे

घाला मर्यादा | सांभाळा वेळ
होईल सगळाच खेळ | अवधूता म्हणे

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments