व्याकूळ उरात माझ्या हि रात्र पेटलेली.
उरली राख विष्ठा, निष्ठा हि जाळलेली..

जळले कईक क्षुद्र म्लेछ जीव जंतू,
काजवे, पतंग, स्वप्ने उरले उग्र दर्प तंतू..

लाचार हे जगने उरले सडले एकनिष्ठ,
करपले आत्मबिंब अंतरंगी बोलके सुस्पष्ट..

खुंटली वाचा कंठ सत्य स्वर फूटेना,
विझली लाकडे उरात धग ही विरेना…

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments