आज पुन्हा झाले असे..

आज पुन्हा झाले असे,
मन माझे वेडे – पिसे…
फेसाळलेल्या लाटांनवर,
जशी चांदण्यांची मोरपिसे…

स्वरगंध कानी आला,
पैंजणांचा नाद तुझ्या…
शिशिरातही शहारला,
स्वप्नतळी मनमोर माझा…

शहारले अंग सारे,
नयन ही तरारले…
तुझ्या आठवणीत सये,
मन पुन्हा हरवले…

दाटल्य कंठांनी,
आश्रु मग बोलु लागले…
कवितेचे पहिले पान,
तुझ्या आठवणीत भिजले…

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments