कळले मला सये, अता कसे जगायचे

कळले मला सये, अता कसे जगायचे,
ह्सनारे ससे पुढे ठेउन, रडणारे कासव मागे सोडायचे…!
मनातले दु:ख सारे मनातच ठेवायचे,
ओठांवर मात्र स्मित हस्य चिटकवायचे,

पन तुच सांग सये वेड्या मनाला कोणी कसे ग सावरायचे,
वाहणारे पाणी कोणी कसे ग अडवायचे,

तुझ्याविना मी कसे ग रहायचे
ह्र्दयाविना श्वास घेउन तुच सांग सये कोनी कसे ग जगायचे

अता कळले मला सये, आपल्या मनाला आपनच सावरायचे
हसनारे ससे पुढे ठेउन रडनारे कासव खुप खुप मागे सोडायचे

कळले मला सये, अता कसे जगायचे…

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments