आवडेल मला ही पाऊस व्हायला

आवडेल मला ही पाऊस व्हायला,
पाऊस होऊन तुझ्या गालावरुन ओठांवर,
आलगद ओघळुन यायला.
आवडेल मला ही पाऊस व्हायला…

आवडेल मला ही पाऊस व्हायला,
पाऊस होऊन तुझ्या तुझ्यासोबत,
चिंब चिंब भिजुन मनसोक्त नाचायला.
आवडेल मला ही पाऊस व्हायला…

आवडेल मला ही पाऊस व्हायला,
पाऊस होऊन तुझ्या ओल्या,
आठवणीत धुंद नाहुन निघायला.
आवडेल मला ही पाऊस व्हायला…

आवडेल मला ही पाऊस व्हायला,
पाण्याचा एक थेंब होऊन तुझ्या केसांतुन अलगद,
धरेवर उतरून मातीसह दर्वळून जायला.
आवडेल मला ही पाऊस व्हायला…

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments