चंद्र जरा ओला झाला

चंद्र जरा ओला झाला,
चांदण्य ही शहारल्या,
आठवणींचा पाऊस सखे,
आज पुन्हा अंगणी आला.

अबोल ती रातराणी,
गंधासह दरवळली,
माती ही तुझ्या प्रितीची,
बघ पुन्हा ओली झाली.

सहवासाच्या प्राजक्तांनी,
आठवनींचा सडा मांडला.
झोपेचा पक्षी माझा,
आज घरट सोडून गेला.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments