सिद्ध केलं मी पुन्हा एकदा, षंढ आहात तुम्ही! तुमच्या सो कॉल्ड संस्कृतीला घोडा लावून मी आज पुन्हा जिंकलो जसा आजपर्यंत जिंकत आलोय. माझ्या वासनेची, माझ्या पुरुषी अहंकाराची दाखवून दिली ताकद आज पून्हा एकदा मी आणि सिद्ध केलं स्वतःला! तसं तर मी तुमच्यापेक्षा बलवान कधीच नव्हतो आणि नसेलही. माझी जात सापाची आहे. तुमच्यासारखे सहज ठेचून मारतील मला पण तुम्ही बसा तुमच्या बहिणींच्या हातच्या राख्या बांधून घेत, मी तयारच आहे त्याच बहिणीना डसायला. मग तर यालच की तुम्ही मेणबत्त्या घेऊन, जास्तच प्रेम उतू गेलं तर रस्त्यावर उतराल- मोर्चे बीरचे काढाल पण तोपर्यंत मी माझं भक्ष्य गिळलेलं असेल, एव्हाना अर्धा अधुरं पचलं देखील असेल.
तुमची ती मोर्च्यातली हतबलता पाहून हुरूप वाढतो माझा. घंटा काय वाईट करणार आहेत तुम्ही माझं!
आमची पिलावळ सगळीकडे पसरलीय, तुमच्याच समाजाला, तुमच्याच समोर वाळवीसारखा पोखरतो मी आणि तुम्ही पाहत राहता उघड्या डोळ्यांनी, कारण तुम्हाला भिती वाटत असते तुमच्याच लोक्कांची. तुमची पोर वयात आल्यावर माझाच हात जातो लाडा लाडाने गालावरून छातीपर्यंत, तुम्ही पाहून ना पाहिल्यागत करता, गर्दीतून तुमच्या आया बहिणींच्या अंगावर कोपरे ढोपरणारा मीच असतो पण काय गर्दीत होत थोडंफार नाही का? माझ्याच नजरा फिरत असतात तुमच्या इज्जतीचा पार तळापर्यंत- मोजून काढतो तुमच्या अंगावरचा केस अन केस तुमच्याचसमोर, पण तुम्हाला सभ्यतेचा ताप आलेला असतो तेव्हा- माझ्या तोंडाला लागून जमणार नसत तुम्हाला. ताप उतरतो तुमचा, जेव्हा कळत तुम्हाला की आम्ही डसलोय तुमच्यामधल्या एकीलाच- मगच झापड उघडतात डोळ्यावरची तुमच्या पण तोपर्यंत उशीर झालेला असतो.
आमची पिलावळ वाढते ती तुमच्यामुळेच! तुमच्या कडे व्यवस्थाच कुठेय आम्हाला ठेचायची? जी व्यवस्था आहे तिला कोलतोय मी वर्षानुवर्षे आणि म्हणूनच मिळत मला माझा भक्ष्य जेव्हा हवं तेव्हा – कधी रस्त्यावर, कधी रात्रीला बसमध्ये, कधी तुमच्या घरातच तर कधी ऐसपैस तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा!
वासनेच विष आता नसानसात भिनलंय आमच्या त्यात अहंकाराचा घोडा सुसाट धावू लागलाय आणि आता आमच्या रस्त्यात कुणी आला तर करकचून गळा आवळून, श्वास कोंडून मारण्यात येईल आणि तुम्ही बसाल कॅण्डल मार्च आणि मोर्चे काढत अगदी तेव्हाच मी शोधत असेल माझं पुढचं भक्ष्य! षंढ आहात तुम्ही षंढ!!!

– जन्मतःच ठेचायला हवा असा तुमच्यातलाच साप

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments