वेश्या – भाग ३

मीराच्या खोलीत एक झीरो वॅट च्या लालसर प्रकाशामुळे खोलीत अंधार नव्हता. पण उजेडही फक्त नावापुरताच होता. टेबलावर एक जुना रेडिओ होता, त्यावर त्याहीपेक्षा एक जुनं गाणं लागलं होत. पण गाणं थोड्ड उडत्या चालीचं होत. त्या गाण्याच्या चालीवर खोलीतला पंखा आवाज करत फिरत होता. त्या लाल प्रकाशामुळे एकूणच वातावरणाला एक वेगळीच धुंदी आली होती. मीराला दरवाजा वाजल्याचा आवाजही आला नाही. दरवाज्यातून कुणीतरी आत आलं. मीरा अर्धवट झोपेत होती. एक हात तिच्या अंगावरून फिरल्याचा भास तिला झाला. तो हात तिच्या गालावरून, छातीवरून, पोटावरून अगदी राकटपणे फिरत होता. मीराचं शरीर जड झालं होत. पंख्याचा वेग आणि आवाज हळू हळू वाढत होता. मीराला तिच्या मानेपाशी काहीतरी गरम हवेचा भास झाला जणू काही कुणाचा श्वास होता. आणि काहीतरी ओलसर, थंड तिच्या मानेवरून सरकल्यागत वाटलं, मीरने डोळे उघडले आणि झटकन कूस बदलली. एक घाणेरडा चेहरा तिच्या मानेवरून जीभ फिरवायचा प्रयत्न करीत होता. मीराने जेव्हा वळून पाहिलं तेव्हा तो काळाकुट्ट चेहरा दात काढून हसत होता. मीरा हादरलीच! तिला काहीच सुचत नव्हतं. त्या माणसांनी तिचे दोन्ही दंड घट्ट पकडून तिला तसाच झोपवून ठेवलं. त्या माणसाचे फक्त दात आणि बुबुळामागचे डोळे पांढरे दिसत होते बाकी तो पूर्ण काळाकुट्ट आणि कुरूप दिसत होता. नाक लिंबाएवढा वाढलेलं, कपाळ आणि भुवया रंगामुळे सारख्याच दिसत होत्या. तो जेवढा विकृत दिसत होता त्याहीपेक्षा त्याच हसणं जास्त विकृत होत. त्याच्या बनियान मधून त्याच पीळदार शरीर खूप आडदांग दिसत होत. मीराने शेजारच्या टेबलावर पाहिलं. एक खाकी पॅन्ट आणि शर्ट तिथे होता. मीराला कळून चुकले की तो कुणीतरी पोलिसातील माणूस आहे. तो हळू हळू मीराच्या जवळ येत गेला. मीराला त्याच्या वासाची भयंकर घृणा येत होती पण तो निर्लज्ज लांडगा होता. मीराने स्वतःला त्याच्याकडून सोडवून घ्यायचा खूप प्रयत्न केला पण तिला कळून चुकले की सगळे व्यर्थ आहे. मीराला झालेला हा सगळ्यात पहिला पुरुषी स्पर्श होता. तो असा होईल असा तिला स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. लांडगा भुकेला होता, त्याच भक्ष्य समोर होत. मीराच्या विरोधाला ना जुमानता त्याने मीराला अर्धनग्न केलं. तो जागोजागी मीराला घाणेरडा स्पर्श करीत होता. तीचं शरीर कुस्कारीत होता. मीराला स्वतःची किळस वाटत होती.

तिची विरोध करायची मर्यादा आता संपली होती हे तिला कळून चुकलं होत आणि एक वेळ अशी आली की तिने विरोध करायचंच सोडलं. निपचित पडून राहिली. मुडद्यासारखं. ते पाहून लांडगा अजूनच चेकाळला. मीराच्या शरीराचे चावे घेऊ लागला, दारूचा घाणेरडा वास पूर्ण खोलीभर पसरला होता, पंख्याचा आवाज त्यात मिसळलेला रेडिओचा आवाज आणि मीराची खूप आतून निघालेली हतबलतेची आर्त आणि मूक किंकाळी त्या खोलीची भीषणता वाढवत होत. लांडग्याला । वासनेची धुंद चढली होती. मीरा आता पूर्ण त्याच्या स्वाधीन झाली होती. पंख्याकडे पाहत मीरा शून्यात बघत दगडासारखी पडून राहिली आणि आणि लांडगा तिच्या अंगावर आला. त्याला जे करायचं होत, त्याची वेळ आली होती. त्याच विकृत हसणं अजून भयानक होत चाललं होत. त्याच्या चेहऱ्यावर एक असुरी आनंद होता. आणि पुढच्याच क्षणाला त्याने स्वतःतल्या सैतानाला झोकून दिलं मीराच्या शरीरामध्ये. मीराच्या पोटात आगीचा डोंब उसळला. जठराची, आतड्याची लाही लाही झाली. तिच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होत पण तोंडातून एक शब्द फुटत नव्हता. तिच्या हतबलतेसोबत त्याचा वेग वाढत होता. वातावरणात त्या बेडच्या कचकचीचा आवाज मिसळला आणि त्या बाजारात आज अजून एक कळी उमलण्या आधीच खुडली गेली

वासनेचा आणि आर्ततेचा हा खेळ बराच वेळ चालू राहिला आणि शेवटी संपला! मीराच्या शेजारी तो माणूस काही वेळ तसाच पडून राहिला. मीराची मात्र काहीच हालचाल होत नव्हती. त्याने मीराकडे एकदा पाहिलं आणि उठून कपडे घातले. मीरा अजूनही स्तब्धच! त्याला अपेक्षित होत की मीरा काहीतरी बोलेल पण डोळ्यांच्या पापण्यांशिवाय तिच्या शरीरात कुठलीच हालचाल होत नव्हती. काहीतरी मोठ जिंकल्याच्या पुरुषी अविर्भावात तो माणूस दरवाजापाशी आला आणि थांबला, त्याला वाटलं आता तरी मीरा काहीतरी बोलेल – पण ती काहीच बोलली नाही. पडून राहिली- सरणावर प्रेत पडून राहत तसं लांडग्याने तिच्या नखशिखांत नग्न शरीराला अजून एकदा पाहिलं, ” रांड साली” असा म्हणाला आणि दरवाजा उघडून निघून गेला.

मीरा पूर्ण नग्नावस्थेत तशीच पडून राहिली. वरती पंखा अजूनही तसाच फिरत होता. त्याचा आवाज तिच्या कानात घुमत होता आणि त्या माणसाचा आवाज कानात शिसे ओतल्यासारखा तिच्या कानात गेला. तिच्या डोक्यात तोच घाणेरडा शब्द दुमदुमत होता, तिच्या डोळ्यासमोर तो घाणेरडा चेहरा आणि त्याच हसणं घुमत होत. सगळं भयाण होत, भीषण होत. “रांड साली” ही शिवी तिच्या आत्म्यापर्यंत लागली आणि ती खूप जोरात ओरडली, ” मी रांड नाहीये, मी रांड नाहीए!!!”

असा म्हणतच ती उठली. शेजारी नूर होती. ती तिच्या चेहऱ्यावर पाणी मारत होती. क्या हुआ रे तेरेको? डर गयी ना मै! नूर घाबरून बोलत होती. मीरा पूर्ण जागी झाली. तिच्या तोंडाला कोरड पडली होती. तिने नूरच्या हातातला ग्लास घेतला आणि घटाघट पाणी प्यायलं. तीच पूर्ण अंग थरथरत होत. श्वासांची गती वाढली होती. ते सगळं स्वप्न होत. कधीही खरं होऊ शकणार घाणेरडं स्वप्न. ऐसे तू रोज बडबड करती क्या नींद में? ऐसा है तू आपण नही सोयेगा तेरे साथ… असं बोलताच नूर बाथरूम मध्ये निघून गेली. दरवाजा वर खटखट झाली. शांताक्का… नूर, तय्यार कर आज तुझ्या पाहुणीला! काळे साहेब रिबन कट करतील आज रात्री!

शांताक्का दरवाजा लावून निघून गेली, नूर ने ते ऐकलं की नाही माहीत नाही पण मीरा ला मात्र ते स्वप्न खरं होताना दिसत होत. …

शांताक्काच बोलणं ऐकून मीरा मेल्याहून मेल्यासारखी झाली. नूर ने तिची तिच्या पद्धतीने समजूत घातली खरी पण मीराला ते पटत नसूनही तो मार्ग पत्करावा लागला. मीराला जसं वाटलं होत तसंच झालं. तिला पडलेलं ते भीषण, भयाण आणि हिडीस स्वप्न खरं झालं होत. वास्तव तिच्या स्वप्नापेक्षा पण घाणेरडं आणि उद्विग्न करणार होत. तीचं पूर्ण जगच बदललं होत. तिच्या जगात दिवसा अंधार व्हायचा त्या छोट्याश्या खोलीत आणि रात्र उजळून निघायची मंद दिव्यांनी! पण तिच्या मनाच्या विश्वात किट्ट काळोख होता. परतीचा मार्ग बंद झाला होता.

मीराला आता या काळोखाची सवय होऊ लागली होती आणि बाहेरच्या प्रकाशाची भीती वाटू लागली होती. एव्हाना तिला इथं येऊन दोन वर्षे पूर्ण झाली होती. या दोन वर्षात तिने जगाचं सगळ्यात घाणेरडं रूप पाहिलं होत. बाहेरच्या जगात दिवसा संस्कारी आणि संसारी म्हणवणारी माणसं रात्रीच्या अंधारात लांडगे बनून मीराच्या शरीराचे लचके तोडायला आसुसलेले असत. त्यांची असुरी हाव न संपणारी होती. खादीवाले, खाकीवाले आणि सो कॉल्ड व्हाईट कॉलरवाले तिच्यासमोर अगदी अधाशीपणे नागडे होताना तिने पाहिले होते. आधी किळस यायची तिला याची पण आता तिला त्यांची कीव येऊ लागली होती. नक्की कोणत्या सुखासाठी ही माणसं धडपडत असावीत? तिला काहीच उत्तर मिळत नव्हतं, नंतर नंतर तर तिने हा विचार करायचा पण सोडून दिला. या दोन वर्षात तिला नूर ची सोबत होती आणि शांताक्काचा आधार. वाईट धंद्यात देखील शांताक्काने तिला आईची माया लावली होती. आईच्या ज्या प्रेमाला मीरा लहानपणापासून मुकली होती ते प्रेम तिला शांताक्का कडून मिळत होत. हा, तिचा स्वार्थ होता त्यामागे पण तीच प्रेम फक्त तेवढ्यापुरतं नव्हतं. ती आजारी पडली की शांताक्का तिच्याकडे जातीनं लक्ष देत, तिची काळजी घेत.

नूर तिची तेवढीच जिवाभावाची मैत्रीण बनली होती. त्या वातावरणात मीरा आता रुळली असली तरी एक भीती मी तिच्या मनात अजूनही दबा धरून बसली होती. रघ्या. त्यानेच तर तिला या दलदलीत आणून सोडलं होत. नूर च आणि रघ्याच छान जमायचं. रघ्या बोलायचा नूर ला, थोड्ड थांब – तुला मी इथून घेऊन जाणार, तुझ्याशी लग्न करणार आणि संसार थाटणार. या थोड्ड थांब ला आता पाच वर्षे उलटून गेली होती. नूर ला पण तो बाता मारतोय हे कळून चुकलं होत, पण इकडे तिकडे येण्या जाण्याचं त्याच्यामुळे भागायचं म्हणून ती त्याला वाईट बोलत नसत. रघ्याची बायको त्याच्या वाईट धंद्यांना कंटाळून माहेरी पळून गेली होती. बायको नाही म्हणून मग तो त्याची गरज नूर कडून भागवून घ्यायचा, खोटी आश्वासन देऊन पण नूर सगळं माहीत असून सुद्धा त्याच्या प्रवाहात वाहत होती. एकदा नूर नसताना रघ्याने दारूच्या नशेत मीरावर हात टाकला होता तेव्हा शांताक्काने त्याची चांगलीच खबर घेतली होती. त्या दिवसापासून ती राघ्यापासून थोडी लांबच राहू लागली होती आणि अशाच काही कारणामुळे आता मीरा आणि नूर च्या नात्यात पण तफावत वाढू लागली होती. नूरलाच कळत नव्हते की मीराची बाजू बरोबर आहे की रघ्याची..

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments